जागा नसल्याचे सांगितले राग अनावर... आणि वाहकाला.. श्रीगोंदा तालुक्यातील प्रकार!


प्रशासक न्यूज,दि.१६मे२०२५

एसटी मध्ये गर्दी असल्यामुळे या एसटीत जागा नाही तुम्ही पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या एसटीने या असे सांगितल्याचा राग येऊन एसटी वाहकालाच खाली पाडून लाथाबुक्क्यानी मारहाण करत त्यांच्या खिशातील ओप्पो कंपनीचा मोबाईल,७००रुपये रोख रक्कम आणि एसटी च्या तिकिटाचे८,१९८रुपये काढून घेतल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी या गावात काल दि.१५रोजी सकाळी पावने नऊ वाजण्याच्या सुमारास घडली असून या घटनेबाबत एसटी वाहक नवनाथ सुखदेव राऊत यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या राजू डाडर रा.काष्टी एक अनोळखी महिला व दोन अनोळखी पुरुष यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणून मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

फिर्यादीने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार काल सकाळी सदर फिर्यादी वाहक हे कर्जत पुणे एसटी बस क्र एम एच १४ बीटी ११५२या बस मध्ये प्रवासी घेऊन जात असताना प्रवासी उतरवण्यासाठी बस काष्टी येथील श्रीगोंदा चौकात थांबवली असता प्रवासी उतरल्यानंतर काही प्रवासी बस मध्ये बसले त्यानंतर एसटीत जागा नसल्यामुळे फिर्यादी असलेल्या वाहक राऊत यांनी बाकी प्रवाश्याना पाठीमागून येणाऱ्या बस ने या असे सांगितले त्याचवेळी एक १६वर्ष्याची मुलगी एसटीत जागा नसताना सुद्धा दरवाजातून आत आली गर्दीमुळे ती मुलगी मोठ्याने ओरडली त्यानंतर राजू डाडर एक अनोळखी महिला दोन पुरुष त्या ठिकाणी आले त्यांनी वाहकाला शिवीगाळ करत चापटीने व लाथाबुक्क्यानी मारहाण केली यावेळी वाद सोडवण्यासाठी मध्ये आलेले एसटीचे चालक विष्णू भारती यांना देखील या लोकांनी धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर बस मधील प्रवासी दुसऱ्या बस ने पाठवून देत वाहक व चालकाने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली

अश्या प्रकारे आपले कर्तव्य बजावणाऱ्या वाहकाला मारहाण झाल्यामुळे श्रीगोंदा आगारातील वाहक चालक यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे पोलीस पुढील तपास करत आहेत

जागा नसल्याचे सांगितले राग अनावर... आणि वाहकाला.. श्रीगोंदा तालुक्यातील प्रकार! जागा नसल्याचे सांगितले राग अनावर... आणि वाहकाला.. श्रीगोंदा तालुक्यातील प्रकार! Reviewed by Prashasak on मे १६, २०२५ Rating: 5

Post Comments

Blogger द्वारे प्रायोजित.