प्रशासक न्यूज,दि.१५मे २०२५
सुरू होण्याआधी पासूनच वादात सापडलेला नगर दौंड रस्त्यावरील निमगाव खलू येथील टोल नाका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे स्थानिक लोकांना डावलून दुसऱ्या गावातील लोकांना घेऊन टोल कसा चालवता असे म्हणत जीवे मारण्याच्या उद्देशाने सात जणांच्या टोळक्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात या टोलनाक्यावरील परप्रांतीय कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे काल दि १४रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून टोल कर्मचारी हिमांशू करुणाशंकर तिवारी यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या ऋषिकेश निकम रा.सांगवी फाटा,श्रेयस कांबळे रा.निमगाव खलू यांच्यासह अनोळखी पाच इसमांविरोधात विविध कलमानुसार आज श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदर घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की सदर फिर्यादी असलेले टोल कर्मचारी हे काल वरील तारीख व वेळेस निमगाव खलू येथील टोल नाक्यावर वाहनांना दिशा दाखवण्यासाठी लेन नंबर ८जवळ उभे असताना एक दिवस आधी सदर कर्मचाऱ्या सोबत वाद घालून गेलेला आरोपी ऋषिकेश निकम हा त्या ठिकाणी आला आणि लेन नं ८ने जाण्याचा आग्रह करू लागला त्यावर फिर्यादी कर्मचारी तिवारी यांनी सदर लेन ही वायर जळाल्यामुळे बंद असून तुम्ही या लेनने गेलात तर संपूर्ण सिस्टीम बंद पडेल असे सांगितले त्याचा राग आल्यामुळे निकम याने सदर कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत तु इथंच थांब मी माझ्या साथीदारांना बोलावतो असे सांगितले त्यानंतर सदर फिर्यादी असणारा कर्मचारी घडलेली घटना सांगण्यासाठी टोल च्या म्यानेजर ऑफिसमध्ये गेला त्या ठिकाणी तेथील म्यानेजरला हकीकत सांगत असतानाच वरील दोन्ही आरोपी व इतर अनोळखी पाच इसम त्या ऑफिसमध्ये आले आणि त्यांनी सदर फिर्यादी कर्मचाऱ्याला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या गळ्यावर चाकूने वार केला तसेच फायटरने मारहाण केल्यामुळे सदर कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे
तुम्ही स्थानिक लोकांना डावलून काष्टीच्या कामगारांना घेऊनं कसा टोल चालवता ते पाहतो असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली
या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्यावर काष्टी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत पोलीस पुढील तपास करत आहेत
चौकट/-आंदोलनकर्ते झाले टोल चालक,आता तरी सूट मिळणार का?
काही महिन्यांपूर्वी सदर टोल मधून स्थानिक लोकांना सूट मिळावी यासाठी मोठं आंदोलन उभारून दोन वेळा हा टोल बंद पाडण्यात आला होता या आंदोलनात सक्रिय सहभाग असणाऱ्या काहीजणांनी आता भागीदारीत हा टोल चालवायला घेतल्यामुळे स्थानिक पातळीवर वाद निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे परंतु स्थानिकांना सूट मिळवण्यासाठी आंदोलन करणारे आता स्थानिकांना टोलमध्ये सूट देणार कां याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला... गंभीर जखमी,गुन्हा दाखल!
Reviewed by Prashasak
on
मे १५, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: