श्रीगोंदा तालुक्यातील दौंड जामखेड रस्त्यावरील आढळगाव या ठिकाणी रखडलेल्या ५४८डी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत वारंवार सूचना करून आंदोलन करून आणि पत्रव्यवहार करून सुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे अधिकारी व या रस्त्याचे कंत्राट घेतलेल्या निखिल कंस्ट्रक्शन चे कर्मचारी सदर काम पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे तसेच या रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे अनेक लोकांचे जीव जाऊन सुद्धा संबंधित अधिकारी कर्मचारी या रस्त्याचे काम पूर्ण करत नसल्यामुळे संतापलेल्या खासदार निलेश लंके यांनी थेट राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता आणि निखिल कंस्ट्रक्शन या ठेकदार कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या कानशीलात लगावल्याची घटना आज आढळगाव याठिकाणी घडल्याची खात्रीशीर माहिती त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शीनी दिली
राष्ट्रीय महामार्ग ५४८डी च्या रखडलेल्या कामाबाबत तसेच रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे सदर भागातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत आज खासदार निलेश लंके हे आढळगाव याठिकाणी उपोषणाला बसणार होते लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभान तांबोळी हे मागील दोन दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत खासदार निलेश लंके दुपारी उपोषणस्थळी पोहोचले त्याठिकाणी त्यांनी वारंवार पत्रव्यवहार करून नागरिकांनी अनेकदा आंदोलन करून सुद्धा रखडलेले अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्यामुळे याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे अधिकारी व संबंधित ठेकेदार कंपनीच्या अधिकारी कर्मचारी यांना चांगलेच धारेवर धरत खडेबोले सुनावले त्याचवेळी खासदारांना राग अनावर झाल्यामुळे त्यांनी संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत त्यांच्या श्रीमुखात लगावल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले यावेळी त्या भागातील नागरिकांच्या भावना देखील संतप्त होत्या अनेक लोकांचे जीव जाऊन सुद्धा संबंधित अधिकारी आणि ठेकेदार काम करत नसल्यामुळे आढळगाव येथील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला परंतु तरीसुद्धा अधिकाऱ्यांना अश्या प्रकारे मारहाण करणे योग्य नसल्याचे मत काहींनी व्यक्त केले
त्यानंतर या रस्त्यावर अपघात होऊन जीव गमावलेल्या लोकांच्या मृत्यूस संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांना कारणीभूत धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आणि आपण दिलेल्या पत्राचा संबंधित अधिकाऱ्यांनी गैरवापर केल्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरत खासदार लंके यांनी थेट श्रीगोंदा पोलीस ठाण्यात चार तास ठिय्या आंदोलन केले
यावेळी पोलीस उपाधीक्षक विवेकानंद वाखारे यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता येणार नाही असे सांगितले त्यानंतर या आधी झालेल्या अपघाताच्या गुन्ह्यात संबंधित ठेकेदाराला सह आरोपी करण्याचे ठरले तसेच खासदारांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्या पत्राचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते
(चौकट)जनभावना संतप्त,अनेकवेळा पत्रव्यवहार करून सुद्धा अधिकारी ठेकेदार दुर्लक्ष करतायेत... खासदार निलेश लंके
अधिकाऱ्यांना मारहाण केल्याबाबत खा लंके यांना विचारले असता त्यांनी यावर थेट प्रतिक्रिया देण्याचे टाळले असले तरी ५४८डी चे काम आढळगाव या ठिकाणी अनेक दिवसांपासून रखडले आहे याबाबत मी स्वतः अनेक दिवसांपासून पत्रव्यवहार केला आहे गावाकऱ्यांनी उपोषण केले आहे अधिकाऱ्यांनी मला लेखी देऊन सुद्धा काम पूर्ण होत नाही या गावातील लोकांच्या भावना संतप्त आहेत अधिकारी आणि ठेकेदार यांना अनेकदा समजून सांगून उपयोग नाही अशी प्रतिक्रिया खासदार लंके यांनी दिली
शेवटी उद्यापासून पूर्ण ताकतीने काम सुरु होऊन दोन महिण्यात सगळ्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याबाबत कार्यकारी अभियांत्यांचे लेखी पत्र घेण्यात आले
मारहाणीच्या प्रकाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला
खासदारांचा संताप अन.... अधिकाऱ्यांना प्रसाद.. त्या प्रकाराने एकच खळबळ!
Reviewed by Prashasak
on
मे १५, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
मे १५, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: