यात्रेच्या दिवशीच माय लेकाचा दुर्दैवी अंत!या गावावर शोककळा... श्रीगोंदा तालुक्यातील घटना!


प्रशासक न्यूज,दि.२२एप्रिल२०२५

गावच्या ग्रामदैवताची यात्रा असल्यामुळे घराची स्वछता करत असताना विजेचा धक्का लागल्यामुळे मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव या गावात आज सकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे चांडगाव गावची आज यात्रा आहे परंतु या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे

या घटनेबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

सदर घटनेबाबत समजलेली माहिती अशी की गावची यात्रा असल्यामुळे चांडगाव येथील राहिवासी राजेंद्र हिरामण लोंढे वय ४९,हे आपले घर धूत होते घर धूत असताना विजेचा धक्का लागला त्यावेळी त्यांच्या आई सखुबाई हिरामण लोंढे वय ७५ या आपल्या मुलाला वाचवण्यासाठी गेल्या असता त्यांना देखील विजेचा धक्का लागला त्यानंतर या दोघं माय लेकाला श्रीगोंद्यात उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु यात या दोघांचा मृत्यू झाला

यात्रेच्या दिवशीच अश्या प्रकारे आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळलहळ व्यक्त होत आहे
यात्रेच्या दिवशीच माय लेकाचा दुर्दैवी अंत!या गावावर शोककळा... श्रीगोंदा तालुक्यातील घटना! यात्रेच्या दिवशीच माय लेकाचा दुर्दैवी अंत!या गावावर शोककळा... श्रीगोंदा तालुक्यातील घटना! Reviewed by Prashasak on एप्रिल २१, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.