हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या,खबरदारीचा उपाय..मोठा पोलीस फौजफाटा तैनात!


प्रशासक न्यूज,दि.२२एप्रिल२०२५

श्रीगोंदा शहर मागील काही दिवसांपासून राज्यात चर्चेत आले आहे त्याचे कारण म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आणि शहराचे ग्रामदैवत संत शेख महंमद महाराज यांच्या दर्गाह ट्रस्ट आणि मंदिर यावरून सुरु झालेला वाद आणि मंदिर निर्माणासाठी टाळ मृदूंगाच्या गजरात आणि भजन कीर्तनाच्या भक्तीरसात मागील सहा दिवसांपासून तहसील कार्यलयासमोर सुरु असलेले बेमुदत धरणे आंदोलन या गोष्टींमुळे.

मंदिर जीर्णोद्धार व्हावा यासाठी हे आंदोलन गुरुवार दि.१७ रोजी वारकरी पद्धतीने भव्य मोर्चा काढून सुरु करण्यात आले प्रशासनाने यात तोडगा काढण्यासाठी प्रांत,पोलीस उपाधीक्षक, पोलीस निरीक्षक,आमदार,प्रमुख नेते मंडळी यांच्या उपस्थितीत बैठका घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पण तो असफल झाला

त्यातच या मंदिरासह आजूबाजूच्या मोठ्या परिसराची वक्फ कडे नोंद झाल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला असून मंदिर निर्माणासाठी सुरु झालेल्या या लढ्यात आता विविध हिंदुत्ववादी संघटनानी उडी घेतली आहे

*हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या,महा आरतीचे आयोजन*

शेख महंमद महाराज मंदिराची वक्फ कडे नोंद झाल्याची माहिती समोर येताच नव्या वादाला तोंड फुटले असून आता या प्रश्नात बजरंग दल,विश्वहिंदूपरिषद,शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या हिंदुत्ववादी संघटना नी उडी घेतली आहे वक्फ कडे झालेली नोंद आणि मंदिराची निर्मिती या विषयावर या संघटना एकवटल्या असून त्यांनी एकत्र येत आज संध्याकाळी सहा वाजता शेख महंमद महाराज मंदिरात महाआरतीचे आयोजन केले आहे
यावेळी वक्फ बोर्डाकडे झालेली नोंदणी याबाबत जनजागृती आणि मंदिर निर्माणात अडथळा ठरणाऱ्यांना अल्टीमेटम दिला जाणार आहे त्यानंतर महाआरती होणार आहे

*पोलिसांची खबरदारी,मोठा पोलीस फौजफाटा तैनात*

आज संध्याकाळी होणाऱ्या महाआरतीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक(१),पोलीस उपअधीक्षक(२), पोलीस निरीक्षक(३),दुय्यम अधिकारी(१२),आरसीपी च्या दोन तुकड्या आणि ५०पोलीस कर्मचारी असा मोठा पोलीस फौजफाटा आज तैनात राहणार आहे


हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या,खबरदारीचा उपाय..मोठा पोलीस फौजफाटा तैनात!  हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या,खबरदारीचा उपाय..मोठा पोलीस फौजफाटा तैनात! Reviewed by Prashasak on एप्रिल २१, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.