चोरट्यांच्या चाकू हल्ल्यात पती,पत्नी जखमी....श्रीगोंदा तालुक्यातील घटना!


प्रशासक न्यूज,दि.२२एप्रिल२०२५

घराच्या पडवीमध्ये कुटुंबासह झोपलेले असताना अनोळखी चार चोरट्यांनी केलेल्या चाकू हल्ल्यात पती,पत्नी गंभीर जखमी झाले आहेत सदर चोरीच्या घटनेत ७५हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यानी चोरून नेले आहेत सदर घटना श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण या गावात आज दि २२रोजी मध्यरात्री एक वाजता घडली आहे

या चोरीबाबत शैला भिवसेन तोंडे यांच्या फिर्यादीवरून चार अनोळखी इसमान विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदर चोरीच्या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की,आज रात्री तोंडे कुटुंबीय त्यांच्या भिंगाण येथील घराच्या पडवित झोपलेले असताना त्या ठिकाणी अचानक चार अनोळखी इसम त्या ठिकाणी आले त्यांनी शैला तोंडे यांच्या हातावर चाकू मारत चाकूचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील आक्काबाई डोरले व मिनीगंठण तोडून घेतले यांचवेळी पत्नीवर चोरट्यानी केलेल्या हल्ल्यातून पत्नीचा बचाव करण्यासाठी पुढे आलेल्या शैला यांचे पती भिवसेन तोंडे यांच्यावर चोरट्यानी हल्ला केला चोरट्यानी केलेल्या चाकू हल्ल्यात तोंडे पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत

सदर घटनेबाबत पोलिसांना माहिती समजताच पोलीस तत्काळ घटनास्थळी गेले या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलीस पुढील तपास करत आहेत

चोरट्यांच्या चाकू हल्ल्यात पती,पत्नी जखमी....श्रीगोंदा तालुक्यातील घटना! चोरट्यांच्या चाकू हल्ल्यात पती,पत्नी जखमी....श्रीगोंदा तालुक्यातील घटना! Reviewed by Prashasak on एप्रिल २२, २०२५ Rating: 5

Post Comments

Blogger द्वारे प्रायोजित.