प्रशासक न्यूज,दि.२३एप्रिल२०२५
घरफोडी,जबरी चोरी,या घटना श्रीगोंदा तालुक्यात सुरु असतानाच चोरट्यानी आता आपला मोर्चा देवाच्या मंदिराकडे वळवला असल्याचे दिसून येते
श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथील गोविंद बाबा महाराज मंदिरातील ६००ग्रॅम चांदीचे आवरण असलेल्या पितळी पादुका चोरांनी चोरून नेल्याची घटना दि.२०एप्रिल रोजी सकाळी सात ते दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली आहे या चोरीत मंदिरातील एकूण ३०हजार रु किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे घटना घडून तीन दिवस उलटून गेल्यानंतर
या चोरीबाबत राजापूर येथील हरिभाऊ विठोबा जगताप यांनी आज बेलवंडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे म.पो.ना. जाधव या घटनेचा पुढील तपास करत आहेतअश्या प्रकारे मंदिरातच चोरी झाल्यामुळे या प्रकाराची सगळीकडे चर्चा होत असून मुद्देमालासह चोरटे लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत
चोरांचा आता मंदिरावर डोळा....या गावात चोरी!
Reviewed by Prashasak
on
एप्रिल २३, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: