दुर्दैवी घटना!काका,पुतण्याचा जागीच मृत्यू.. श्रीगोंदा तालुक्यातील या गावावर शोककळा

प्रशासक न्यूज,दि.५मे२०२५

श्रीगोंदा तालुक्यात घडणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे मागील काही दिवसात रस्ते अपघातात जीव गमावणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे
रात्रीच्या वेळी दुचाकीवरून घरी जात असताना एका चारचाकी वाहणाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे अपघात होऊन तरुण चुलता व पुतण्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील दौंड जामखेड रस्त्यावर आढळगाव शिवारात डीवाय १२ चारी नजीक काल रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे
अतुल एकनाथ शिंदे वय ३०,रोहित उर्फ बंटी भरत शिंदे वय २३अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत मयत दोन्ही तरुण हे चुलत काका पुतणे आहेत 

सदर घटनेबाबत मयताच्या नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की काल रात्री आढळगाव येथील हे दोन्ही चुलते पुतणे गावाकडे जात असताना एका चारचाकी वाहणाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेमुळे गंभीर जखमी झालेल्या या काका पुतण्याचा जागीच मृत्यू झाला घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर या दोघांना उपचारासाठी श्रीगोंद्यात आणण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले
एकाच घरातील असे दोन तरुण ठार झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

दुर्दैवी घटना!काका,पुतण्याचा जागीच मृत्यू.. श्रीगोंदा तालुक्यातील या गावावर शोककळा दुर्दैवी घटना!काका,पुतण्याचा जागीच मृत्यू.. श्रीगोंदा तालुक्यातील या गावावर शोककळा Reviewed by Prashasak on मे ०४, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.