प्रशासक न्यूज,दि.२१मे २०२५
महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे श्रीगोंद्यात कार्यकर्त्यांनी शनीचौकात फटाके फोडत एकच जल्लोष केला भुजबळ यांचा शपथविधी सोहळा काल राजभवनात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
ओबीसी समाजाचे हृदयसम्राट म्हणून ख्याती असलेले छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळताच श्रीगोंदा शहरातील समता परिषदेच्या सैनिकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी मा. पोलिस उपायुक्त कांतिलालजी कोथिंबिरे,अस्तित्व फाउंडेशचे अध्यक्ष गोरख आळेकर, नगरसेवक शहाजी खेतमाळीस, मा.उपनगराध्यक्ष राजूदादा गोरे, सुधीर खेडकर, मुकुंद सोनटक्के, प्रशांत गोरे, नगरसेवक संतोष कोथिंबिरे, प्रशांत गोरे, मा. चेअरमन बापूराव सिदनकर, महादू खेतमाळीस, किरण बनसुडे, महादू बोरुडे, सागर बोरुडे, दिलीप आळेकर, पोपट कोथिंबिरे, सुदाम कोथिंबिरे, लक्ष्मण कोथिंबिरे, शिवाजी राऊत, कांतिलाल कोकाटे आदी उपस्थित होते.
मंत्रिमंडळात समावेश,श्रीगोंद्यात जल्लोष...!.
Reviewed by Prashasak
on
मे २०, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: