प्रशासक न्यूज,दि.२२मे२०२५
श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगावपिसा येथील ग्रामपंचायतीत झालेल्या गैरकारभार व भ्रष्टाचाराबाबत जिल्हा परिषद व पंचायत समिती मार्फत तपासणी होऊन या कार्यालयाच्या तपासणी अहवालात त्या गावचे तत्कालीन ग्रामसेवक साबळे यांनी ३०ते३५लाख रुपयांचा अपहार तसेच अनियमितता केले असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे असे असून सुद्धा जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील अधिकारी आर्थिक तडजोड करून या ग्रामविकास अधिकाऱ्याला वाचवत आहेत त्यांना पाठीशी घालत आहेत त्यामुळे सदर दोषींवर निलंबनाची कारवाई न झाल्यास येत्या २जून पासून अहिल्यानगर जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा श्रीगोंदा तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष ऍड मयूर दिनकर पंधरकर(जगताप)यांनी जिल्हा परिषदेला दिलेल्या निवेदनातून दिला आहे
या निवेदनात ऍड पंधरकर(जगताप)यांनी म्हंटले आहे की,
श्रीगोंदा तालुक्यातील अतिशय संवेदनशील मानल्या जाणा-या पिंपळगाव पिसा ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविषयी गेल्या वर्षभरापासुन मी पाठपुरावा करत असुन यातुन जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी नेमलेल्या चौकशी अधिका-यांनी केलेल्या चौकशी दरम्यान ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी ए.एल.साबळे यांचे अनेक कारनामे समोर आले आहेत.
त्यामध्ये प्रामुख्याने १. ग्रा.पं. कर वसुलीची रक्कम बँकेत भरणा न करता परस्पर रक्कमा खर्च केल्या असुन रुपये ५५,१२७ चा कायमस्वरुपी अपहार केला आहे. २. अंदाजपत्रक व मुल्यांकन नसतांना शासकीय कपाती न भरता रक्कमा खर्च केल्या आहेत. ३. ग्रामपंचायत कर्मचा-यांना कोणत्या महिन्याचे वेतन अदा केले याबाबत काहीही नमुद केले नसुन ग्रामपंचायत कर्मचा-यांना मोघम स्वरुपात वेतन दिले आहे. भविष्य निर्वाह निधी रक्कमा ग्रामपंचायत हिस्सा बँकेत वर्ग केल्या नसुन रक्कम रु ४०,००० चा संशयीत अपहार केला आहे. ४.महा शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग, शासन परिपत्रक क्रं एलएफसी-२००४/प्र.क्रं.४५४०/वित्त-३ (२४) दि.१४.७.२००४ अन्वये पाणीपुरवठा योजनांचे देखभाल दुरुस्तीवरील खर्च पाणीपटटी वसुलीतुनच करणे आवश्यक असतांना इतर उत्पन्नातुन खर्च करुन याकामी वित्तीय अनियमितता केली आहे. ५.ग्रामपंचायत कर्मचा-यांना प्रदान वेतन व राहणीमान भत्ता याबाबत न नं २१ अपुर्ण असल्याने अदा केलेले वेतन व राहणीमान भत्ता याबाबत वित्तीय अनियमितता केली आहे. ६. केंद्र शासनाने विकसीत केलेल्या गव्हर्नमेंट-ई-मार्केटप्लस पोर्टलची कार्यपध्दती राज्य शासनाने स्वीकृत केली असुन शासन तरतुदीप्रमाणे ग्रामपंचायतीने गव्हर्नमेंट-ई-मार्केटप्लस पोर्टलवरुन वस्तुची खरेदी न करुन वित्तिय अनियमितता केली आहे. ७. ग्रापं पिंपळगांव पिसा ता श्रीगोंदा येथे निविदा समिती स्थापन झालेबाबत दस्तऐवज तपासणीसाठी उपलब्ध करुन दिलेले नाहीत. ८. महाराष्ट्र शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, शा.नि.दि.२८.११.२०१८ मधील मार्ग -दर्शक सुचना क्रं १ मध्ये नमुद केलेनुसार ग्रामपंचायतीने विकास कामे करतांना कामांच्या निविदा रक्कमेनुसार आवश्यक रक्कमेच्या मुद्रांकावर करारनामे न करुन वित्तिय अनियमितता केली आहे. ९. शासकीय कामांचे शुल्क व कर कपातीची रक्कम बँकेत भरणा केलेली प्रमाणीत चलने तपासणीकामी उपलब्ध न करुन वित्तिय अनियमितता केली आहे. १०. १५ वा वित्त आयोगाच्या कालावधीमध्ये रुपये ३६,५७,४०० ची वित्तीय अनियमितता व रक्कम रुपये १४,१७,५९१/-चा संशयित अपहार केला आला आहे. ११. ग्रामपंचायत मासिक सभा/ग्रामसभा मध्ये बाबवार खर्चास मान्यता घेतली नसुन मोघम स्वरुपात मान्यता घेतली आहे. सन २०२०-२१ ते २०२४-२०२५ या कालावधीतील ग्रामसभा इतिवृत नोंदवही तपासणीकामी उपलब्ध करुन दिली नसुन १५ व्या वित्त आयोगाच्या आराखड्यास ग्रामसभेची मान्यता घेतलेली नसुन नियमबाहय खर्च करुन वित्तिय अनियमितता केली आहे. १२. ग्रामपंचायत पिंपळगांव पिसा यांनी शा नि दि.२७.४.२०१८ नुसार मार्गदर्शक सुचना क्रं.३.१ नियमितपणे विहित कालावधीमध्ये ग्रामसभांचे आयोजन करणे आवश्यक असतांना अनिवार्य ग्रामसभा दि.२६ जानेवारी रोजी आयोजित न करुन ग्रामस्थांच्या संवैधानिक हक्कांचा भंग केला आहे. १३. अनु जाती व नवबौध्द घटकांचा विकास करणे अंतर्गत घेतलेल्या कामामध्ये मुल्यांकनापेक्षा रु १,९४,७१०/-जास्त खर्च करण्यात आला असुन संबधित ठेकेदारांना शासकीय कपातीसह रक्कमा अदा करुन न करुन वित्तिय अनियमितता केली आहे. १४. शासकीय कपाती केलेबाबत चलन तपासणीसाठी उपलब्ध करुन दिले नाही व ठेकेदारांकडुन सुरक्षा अनामत न भरुन वित्तिय अनियमितता केली आहे.
अश्या अनेक मुद्यांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार ग्रामपंचायत अधिकाऱ्या ची कार्यालयीन अनियमितता स्पष्ट झालेली असुन यामुळे गटविकास अधिका-यांमार्फतही वरील प्रमाणे गैरवर्तन करुन महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणुक) नियम १९६७ मधील ३ चा भंग केल्याने शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र असल्याबाबतचा प्रशासकीय अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केलेला आहे. परंतु आजतागायत कारवाईस प्रात्र असताना कोणतीही कारवाई संबंधितांवर झालेली नाही.
******
तात्काळ निलंबन व फौजदारी कारवाई झाल्याशिवाय थांबणार नाही- अॅड मयुर पंदरकर
तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी ए. एल.साबळे यांची चौकशीत आरोप सिध्द होऊनही कोणतीही कारवाई केली जात नाही यातुन वरिष्ठ अधिकारी हे संबंधिताकडुन आर्थिक तडजोड करुन पाठीशी घालत आहेत. परंतु या कारवाई साठी कोणत्याही स्तरावर जायची वेळ आली तरी जाणार असुन संबंधिताने प्रशासनाची दिशाभुल करुन लाखो रुपयांची जनतेची कर्मचा-यांची केलेली फसवणुक जनतेसमोर आणणार आहे.
'दोषी' ग्रामसेवकासह त्याला पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई करा! अन्यथा.... युवा अध्यक्षांचा ईशारा
Reviewed by Prashasak
on
मे २१, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
मे २१, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: