प्रशासक न्यूज,दि.२८मे २०२५
विशाल अ चव्हाण
काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेल्या आणि एकमेकांची जिरवण्यासाठी आणि पाडापाडी करण्यासाठी एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या आणि याच राजकीय विरोधामुळे आमदार विक्रम पाचपुते यांच्या विजयाची वाट सुकर करणाऱ्या नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि माजी आमदार राहुल जगताप यांच्यात पुन्हा राजकीय समेट घडून आल्याची सोशल मिडीयात जोरदार चर्चा असून या वृत्ताला दोन्ही गटातील नेत्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी दुजोरा दिला आहे त्याचप्रमाणे नागवडे आणि जगताप हे दोन्ही नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपक्षात आज एकाचदिवशी एकाचवेळी प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे त्यामुळे नागवडे जगताप यांच्यातील राजकीय समेटावर एकप्रकारे शिक्का मोर्तब झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही श्रीगोंद्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची ताकद वाढणार असून येत्या काळात होणाऱ्या श्रीगोंदा नगरपरिषद, पंचायत समिती जिल्हापरिषद निवडणुकीवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करत राजेंद्र नागवडे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत मशाल हाती घेतली होती त्यानंतर माजी आमदार राहुल जगताप आणि नागवडे यांच्यात महाविकास आघाडीचे तिकीट मिळवण्यावरून मोठा राजकीय संघर्ष झाला एकमेकांवर टोकाचे आरोप प्रत्यारोप झाले त्यानंतर अनुराधा नागवडे यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवली तर राहुल जगताप यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली होती त्यानंतर त्यांना पक्षातून निलंबीत करण्यात आले होते विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेते पराभूत झाले त्यानंतर नागवडे यांची आधी शिंदेच्या शिवसेनेते तर नंतर भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा झाली तसेच राहुल जगताप हे देखील भाजप मध्ये किंवा शिंदेच्या शिवसेनेत जाणार अशी चर्चा असतानाच आज दोन्ही नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सामील होत आहेत
याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी माजी आमदार राहुल जगताप यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही तर राजेंद्र नागवडे यांनी पक्षप्रवेशाच्या वृत्ताला दुजोरा दीला आहे
*खुद्द अजित दादांनीच समेट घडवल्याची चर्चा*
मिळालेल्या माहितीनुसार काल नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पक्षप्रवेशा बाबत गेले होते त्यांचा प्रवेश निश्चित झालेला असतानाच माजी आमदार राहुल जगताप हे देखील अजित पवार यांना भेटण्यासाठी त्याठिकाणी गेले तेव्हा खुद्द अजित पवार यांनी दोन्ही नेत्यांना प्रवेश झाल्यानंतर एकत्रित काम करणार का अशी विचारणा केली त्यावर दोन्ही नेत्यांनी होकार दिल्यानंतर आज दोन्ही नेत्यांचे प्रवेश होत आहेत त्यामुळे अजित पवार यांच्या मध्यस्थीने नागवडे व जगताप हे पुन्हा एकत्रीत येणार आहेत
*श्रीगोंद्यात अजित दादांची राष्ट्रवादी हाऊसफुल्ल*
श्रीगोंद्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जोरदार इन्कमिंग सुरु आहे विधानसभेला वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी केलेले जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार हे काही दिवस आधीच राष्ट्रवादीत गेलेले आहेत त्यांच्या पाठोपाठ विधानसभेला काँग्रेस मध्ये गेलेले घनश्याम शेलार हे देखील काही दिवस आधीच जास्त बोभाटा न करता अजित दादांच्या राष्ट्रवादीत गेलेले आहेत बाळासाहेब नाहाटा आणि दत्तात्रय पानसरे हे दोन्ही नेते आधीच अजित दादांसोबत आहेत त्यातच आज राजेंद्र नागवडे आणि राहुल जगताप यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होत असल्यामुळे श्रीगोंद्यात अजित पवार यांची राष्ट्रवादी हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे
श्रीगोंद्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जोरदार इन्कमिंग सुरु आहे विधानसभेला वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी केलेले जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार हे काही दिवस आधीच राष्ट्रवादीत गेलेले आहेत त्यांच्या पाठोपाठ विधानसभेला काँग्रेस मध्ये गेलेले घनश्याम शेलार हे देखील काही दिवस आधीच जास्त बोभाटा न करता अजित दादांच्या राष्ट्रवादीत गेलेले आहेत बाळासाहेब नाहाटा आणि दत्तात्रय पानसरे हे दोन्ही नेते आधीच अजित दादांसोबत आहेत त्यातच आज राजेंद्र नागवडे आणि राहुल जगताप यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होत असल्यामुळे श्रीगोंद्यात अजित पवार यांची राष्ट्रवादी हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे
*तालुक्यात विरोधक नाममात्रच*
आज होणाऱ्या प्रवेशानंतर श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे श्रीगोंद्याचे आमदार भाजपचे आहेत त्यातच आता तालुक्यात सर्वच प्रमुख पाचपुते विरोधी नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेल्यामुळे सर्वच नेते सत्ताधारी पक्षात गेल्यामुळे श्रीगोंद्यात आता विरोधी पक्षातील काँग्रेस ,शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये कोणताही मोठा नेता शिल्लक राहणार नाही त्यामुळे आता तालुक्यात फक्त शिवसेना ठाकरे गटाचे साजन पाचपुते हेच एकमेव विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत राहणार असेच चित्र दिसत आहे
*विधानसभेलाच हा समेट का घडला नाही? कार्यकर्त्यांचा सवाल*
विधानसभा निवडणुकीत एकापेक्षा जास्त उमेदवार पाचपुते यांच्या विरोधात उभे राहिल्यानंतर पाचपुते यांचा विजय सोपा होता हा इतिहास माहित असूनसुद्धा नागवडे व जगताप हे विधानसभेला एकमेकांच्या विरोधात लढले आणि दोघे पराभूत झाले त्याचवेळी या दोन्ही नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत राजकीय समेट का घडवून आणला नाही असा सवाल दोन्ही गटाचे कार्यकर्ते उपस्थित करत आहेत दरम्यान आजच्या प्रवेशबाबाबत काही मोजक्या कार्यकर्त्यांना व्यतिरिक्त इतर कार्यकर्त्यांना अंधार ठेवत हा प्रवेशाचा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतल्यामुळे काही कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसत आहे
*पाचपुते यांची डोकेदुखी वाढणार*
नागवडे व जगताप विधानसभेला एकमेकांच्या विरोधात लढल्यामुळे आमदार विक्रमसिंह पाचपुते हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते त्यातच नागवडे आणि जगताप यांच्यात मोठी राजकीय दरी निर्माण झाल्यामुळे पाचपुते यांच्यासाठी ही राजकीय फायद्याची आणि जमेची बाब होती परंतु आता पुन्हा नागवडे जगताप हे राजकीय वैर विसरून एकत्र येत आहेत त्यातच पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील सर्व नेते अजित पवार यांच्या गटात सामील झाल्यामुळे तालुक्यात आता पुन्हा पाचपुते विरोधी नेत्यांची मोट बांधली जाणार आणी त्याचा परिणाम येत्या काही महिन्यात होणाऱ्या निवडणुकांवर होणार असल्यामुळे आमदार विक्रम पाचपुते यांची डोकेदुखी वाढणार आहे
तालुक्यातील प्रमुख नेत्यांच्या या पक्षप्रवेशामुळे तालुक्याच्या राजकारणाला पुन्हा कलाटणी मिळणार आहे
समेट घडला?मुहूर्त ठरला... तालुक्याच्या राजकारणाला पुन्हा मिळणार कलाटणी!
Reviewed by Prashasak
on
मे २७, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: