प्रशासक न्यूज,दि.७जून२०२५
श्रीगोंद्याचे ग्रामदैवत संत शेख महंमद महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी सर्व ग्रामस्थ,यात्राकमिटी तसेच सर्व भाविक यांच्या वतीने श्रीगोंदा तहसील कार्यालयावर काही दिवसांपूर्वी मोर्चा काढत त्या ठिकाणी अनेक दिवस धरणे आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी माजी आमदार बबनराव पाचपुते यांनी आंदोलकांशी चर्चा करून मंदिर प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घडवून आणून सदर प्रश्नावर २८मे पर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते परंतु आता ती तारीख उलटून गेल्यावर सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे याबाबत ना बैठक लागली ना मंदिर निर्माण प्रश्नावर अद्यापपर्यंत कुठलाच तोडगा निघाला. त्यामुळे आता येत्या १४जुलैपर्यंत सरकारने सदर प्रश्नात लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अन्यथा आषाढी वारी नंतर १४जुलै पासून अतिशय तीव्र स्वरूपाचे आंदोलन गावकरी आणि वारकरी यांच्या वतीने सुरु करण्यात येईल अशी माहिती आज घनश्याम आण्णा शेलार आणि जेष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी दिली आज शेख महंमद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या प्रश्नावर पुढील भूमिका ठरवण्याबाबत घनश्याम शेलार यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत घनश्याम शेलार व जेष्ठनेते बाबासाहेब भोस यांनी पत्रकारांशी संवाद साधला
यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष गोपाळराव मोटे पाटील,महंमद महाराज यांचे वंशज रियाज शेख,एकनाथ आळेकर प्रा बाळासाहेब बळे सर,नानासाहेब कोथिंबीरे,राजू मोटे पाटील,सुदाम तात्या झुंझरूक,सुनील वाळके हे उपस्थित होते
यावेळी बोलताना घनश्याम शेलार म्हणाले की मंदिराची वक्फ बोर्डाकडे केलेली नोंदणी रद्द व्हावी तसेच शेख महंमद बाबा दर्गाह हे नाव बदलण्यात यावे हे जर झाले नाहीतर आता जनभावना तीव्र असून उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाणार आहे तसेच हे आंदोलन नेमके कुठे होणार हे निश्चित झालेले नसले तरी ते महंमद महाराज मंदिरात किंवा प्रशासकीय कार्यालयासमोर केले जाणार असल्याचे शेलार यांनी सांगितले आंदोलनाचे स्वरूप आता कसे असेल असे विचारले असता या प्रश्नावर शेलार म्हणाले ते आंदोलनाच्या आधी ठरवले जाईल
*मंदिराच्या प्रश्नात कुणी राजकारण आणू नये*
मंदिर व्हावे यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत त्यामुळे मंदिर प्रश्नात कुणी राजकारण आणू नये कुणी समाजात गैरसमज पसरवू नये असे घनश्याम शेलार यांनी सांगत वक्फ कडे नोंद झाल्याबाबत नियोजन बैठकीत माहिती न दिल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केल्याबाबत आणि आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी देखील आपल्याला या बाबत माहिती न दिल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती यावर शेलार यांना विचारले असता त्यावर उत्तर देताना शेलार म्हणाले की आंदोलनाच्या एक दिवस आधी १६तारखेला प्रशासकीय बैठकीत मी स्वतः याबाबत माहिती दिली होती त्यामुळे याबाबत कुणी दिशाभूल करू नये आणी राजकारण करू नये तसेच आमीन शेख यांनी वक्फ कडे नोंद होण्यासाठी लेटर पॅड वर पत्र दिले होते आणि आता ती नोंद रद्द करण्यासाठी साध्या कागदावर ते अर्ज करतात ही दिशाभूल आणि लोकांची फसवणूक नाही का टीकाकारांनी आमच्यावर टीका करण्या ऐवजी याच्यावर बोललं पाहीजे असे शेलार म्हणाले
*दोन्ही बाजूने लढाई लढणार*
ग्रामदैवताचे मंदिर बांधण्यासाठी आता आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून आणि कायदेशीर दृष्ट्या दोन्ही बाजूने लढाई लढणार आहोत २००८सालीच न्यायालयाने मंदिराबाबत जैसे थेचा आदेश दिल्यानंतर सुद्धा आमीन शेख यांनी मंदिरात बेकायदेशीर रीतीने जे बांधकाम केले हा न्यायालयाचा अवमान असून आम्ही शेख यांच्यावर त्याबाबत याचिका दाखल करणार असल्याचे शेलार यांनी सांगितले
तसेच यात्रा कमिटीने आम्हाला जेल मध्ये टाकल्यामुळे आम्ही मंदिराची वक्फ कडे नोंद केल्याबाबत आमीन शेख चुकीच्या पद्धतीने सांगत आहेत त्यावेळी शेख यांनी महंमद महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर असलेले पुस्तक छापले होते त्यावरून पोलिसांनी फिर्यादी होऊन शेख यांना अटक केली होती त्याच्याशी यात्रा कमिटीचा कुठलाही संबंध नव्हता असे देखील शेलार यांनी आज स्पष्ट केले
*आत्तापर्यंत बैठक का झाली नाही?*
राज्यात महायुतीचे सरकार आहे मुख्यमंत्री भाजपचे आहेत श्रीगोंद्याचे आमदार भाजप चे आहेत तसेच आता तालुक्यातील सर्वच नेते महायुतीत सामील झालेले आहेत असे असताना सुद्धा मुख्यमंत्र्यासोबत अद्याप बैठक का झाली नाही असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावर जास्त बोलण टाळत आज याबाबत माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्यासोबत आम्ही बोलणार असल्याचे जेष्ठनेते बाबासाहेब भोस यांनी सांगितले
राज्यात महायुतीचे सरकार आहे मुख्यमंत्री भाजपचे आहेत श्रीगोंद्याचे आमदार भाजप चे आहेत तसेच आता तालुक्यातील सर्वच नेते महायुतीत सामील झालेले आहेत असे असताना सुद्धा मुख्यमंत्र्यासोबत अद्याप बैठक का झाली नाही असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावर जास्त बोलण टाळत आज याबाबत माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्यासोबत आम्ही बोलणार असल्याचे जेष्ठनेते बाबासाहेब भोस यांनी सांगितले
मागे आंदोलन करून त्यावर कुठलाच ठोस मार्ग न निघाल्यामुळे आता पुन्हा आंदोलन करून मार्ग निघणार का यावेळचे आंदोलन कसे असेल हे येणाऱ्या काळात समजणार असले तरी आता यात्रा कमिटीने पुन्हा आंदोलन छेडण्याचा ईशारा दिल्यामुळे येणाऱ्या काही दिवसात श्रीगोंद्याच्या ग्रामदैवताच्या मंदिर जीर्णोद्धाराचा प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही
ना बैठक,ना तोडगा... सरकारला अल्टीमेटम!
Reviewed by Prashasak
on
जून ०७, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: