साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास.....चोरट्यांचा आता यावर डोळा!


प्रशासक न्यूज,दि.८जून२०२५

घरफोडी,दरोडा,रस्तालूट,जनावरांची चोरी, शेतमालाची चोरी,मंदिरात चोरी,दुचाकीची चोरी अश्या प्रकारच्या चोऱ्या श्रीगोंद्यात होत असतानाच चोरट्यानी आपला मोर्चा आता कृषीव्यवसायीकांच्या दुकानाकडे वळवल्याचे दिसत आहे 

श्रीगोंदा तालुक्यातील चिखली गावातील बसस्थानका नजीक असलेल्या रामेश्वर ऍग्रो मॉल अँड ऍग्री बिझनेस सेंटर या दुकानाचे शटर तोडून चोरट्यानी जवळपास ६,४२,०००रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे सदर चोरीची घटना आज दि.८जून रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली गावातील मुख्य भागातील राहिवाशी असलेल्या परिसरात कृषी व्यवसायिकाचे दुकान फोडत एवढी धाडसी चोरी झाल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे
सदर चोरीबाबत दुकान मालक सागर मच्छिन्द्र झेंडे रा.वडाचीवाडी चिखली यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे

सदर चोरीबाबत फिर्यादित म्हंटल्याप्रमाणे
आज दि ८रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोराने कृषी व्यावसायिक झेंडे यांच्या मालकीच्या रामेश्वर ऍग्रो मॉल अँड ऍग्री बिझनेस सेंटर या दुकानाचे पत्र्याचे नट खोलून पत्रे काढून दुकानात प्रवेश करत दुकानातील ३,८४,००० रु किमतीचे एकुण ८ बॉक्स् पंचगंगा कंपनीचे कांद्याचे बी,त्यानंतर प्रत्येकी ४८,०००रु किंमत असलेले एकुण ८ बॉक्स् महागुजरात कंपनीचे कांद्याचे बी,२,००,०००/-रु किंमतीचे परिफ्लेक्स कंपनीचे किटकनाशक,तणनाशक,टॉनिक
१०,०००रु किमतीचा एक एच.पी.कंपनीचा कॉम्पप्युटरचा सी.पी.यु अश्या प्रकारे चोरट्याने दुकानातील एकूण ६,४२,०००/-रु किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे

घरफोडी,दरोडा,देवाच्या मंदिरातील चोरी, शेतमालाची चोरी आणि त्यानंतर आता अश्या प्रकारे चोरट्यानी शेतीची बियाणे आणि औषधाची एवढी मोठ्या प्रमाणात चोरी केल्यामुळे कृषी व्यवसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे चालुवर्षी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरु झाल्यामुळे कृषीव्यवसायिकांचा आता हा धंद्याचा मोसम असतानाच या कृषी व्यवसायिकाचा एवढा माल चोरीला गेल्यामुळे त्या व्यवसायिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्याबाबत हळहळ व्यक्त आहे तसेच सदर चोर बेलवंडी पोलिसांनी लवकरात लवकर जेरबंद करावेत अशी मागणी गावाकरी करत आहेत


साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास.....चोरट्यांचा आता यावर डोळा! साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास.....चोरट्यांचा आता यावर डोळा! Reviewed by Prashasak on जून ०८, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.