आता 'त्या' जागेवरून नवा वाद...तालुकाध्यक्षांना पदावरून हटवण्याची मागणी!


प्रशासक न्यूज,दि.१०जून२०२५

श्रीगोंदा शहरात ताबेमारीचे प्रकार सूरु असतानाच आता शहरातील बाजारतळावरील राम मंदिराच्या जागेवरून नवा वाद सुरु झाला आहे सदर राम मंदिराच्या जागेची बापू माने यांनी धर्मादाय आयुक्तांच्या परवानगी शिवाय खरेदी केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार ताडे यांनी करत त्याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली होती

आज त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी बी एम ग्रुपचे अध्यक्ष बापुशेठ माने यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी त्यांच्यासोबत सदर राममंदिर जागेचे मूळ वारसदार चंद्रनंदन सारंग ताडे हे देखील उपस्थित होते

यावेळी बोलताना बापू माने यांनी सांगितले की,मी व्यवहार केलेली जागा ही राममंदिराची नाही त्या जागेचा आणि राममंदिराचा काहीही संबंध नाही तसे सिद्ध झाल्यास मी होणाऱ्या कायदेशीर कारवाईस तयार आहे यावेळी माने यांनी ताडे यांच्यावर गंभीर आरोप केले राममंदिराच्या नावाखाली मुळ वारसदारांची नावे कमी करण्यासाठी नंदकुमार ताडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचा कार्यकर्ता आणि त्यांच्या पक्षाचे तालुकाध्यक्ष पदाचा गैरवापर करत शिवसेनेच्या लेटरपॅडवर तहसीलदारांना पत्र देऊन त्यांच्यावर आपल्या पदाचा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप करत सदर लेडरपॅडवर दिलेले पत्र त्यांनी पत्रकारांना दाखवले तसेच या प्रकाराबाबत नंदकुमार ताडे यांना शिवसेनेच्या तालुकाअध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी माने यांनी यावेळी केली याबाबत संबंधित लोकांशी पत्रव्यवहार केल्याचे माने यांनी सांगितले 

तसेच चंद्रनंदन ताडे यांनी सुद्धा नंदकुमार ताडे यांच्यावर गंभीर आरोप केले त्यांनी सांगितले की नंदू ताडे यांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेत सहायक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे राममंदिराच्या मठाच्या जागेचे सि.स.नं.२०४८मध्ये खरे कायदेशीर विश्वस्त व मालक यांना लपवून ठेवले आहे सहायक धर्मादाय आयुक्त यांची दिशाभूल करत शपथेवर खोटे कागदपत्र तयार केलेलं आहेत तसेच रामाच्या मंदिराच्या नावाखाली गट नं ११२१मधील संबंध नसलेली जमीन फुकट लुबाडण्यासाठी दि५/११/२०१२ रोजी कार्यकारी दांडाधिकारी श्रीगोंदा यांच्या समोर सुद्धा खोटे शपथपत्र तयार केलेले आहे तसेच गट नं ११२१ चे सातबारा उताऱ्यावर खोट्या नोंदी करून खोटा फेरफार नं १७८३२तयार करून खोटे महसूल कागदपत्रे तयार केले आहेत याबाबत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ताडे यांनी पोलिसांकडे केली आहे

तसेच नंदू ताडे हे रामाच्या मठाची जागा ही एकट्याच्या मालकीची आणि एकटेच विश्वस्त म्हणून त्यावर हक्क दाखवत आहेत ते चुकीचे असून सदर जागेत १/३हिश्याप्रमाणे इतर वारसदारांचा सुद्धा हक्क असून दि१७/०१/१९१९च्या खरेदीप्रमाणे १ते ३ खरेदीदार हेच या जागेचे कायदेशीर मालक असल्याचे चंद्रनंदन ताडे यांनी सांगितले तसेच नंदकुमार ताडे हे आपल्या कुटुंबाला व सदर जागेच्या वारसदारांना धमकावत असून त्यांच्या दहशतीमुळे कुणी पुढे येत नसल्याचे त्यांनी सांगितले

*मंदिराचे बांधकाम बेकायदेशीर*

बाजारतळावर नंदकुमार ताडे यांनी बांधलेले राममंदिर हेच बेकायदेशीर असून त्याला परवानगी नाही तसेच १९१९च्या खरेदीखताप्रमाणे रामाच्या मठाची जागा/जमीन ही स्वतंत्र आहे सदर जागेला सिटी सर्व्हे नं २०४८पडलेला आहे त्यामुळे आपण घेतलेल्या जमिनीचा रामाच्या मठाच्या जागेशी कुठलाही संबंध नाही सर्व्हे नं १२०७ व २०४८या दोन स्वतंत्र मिळकती आहेत तसेच गट नं ११२१ मध्ये राममंदिराची जागा नाही धार्मिक स्थळ पड एवढा उल्लेख आहे उलट ताडे यांनीच सदर राममंदिर हे बेकायदेशीर रित्या दुसऱ्या जागेत बांधल्याचा आरोप बापू माने यांनी केला आहे

तसेच ताडे हे दिवाळीच्या वेळी फटाकाविक्रिचे स्टॉल लावणाऱ्या लोकांकडून भाडे वसूल करताना सदर जागेचा राममंदिराची जागा म्हणून उल्लेख करत नाहीत ताडे यांनी चुकीच्या पद्धतीने मुळ मालकांना जागेतून कमी करून राममंदिराचे नाव लावल्याचा गंभीर आणी खळबळजनक आरोप बापू माने यांनी पत्रकार परिषदेत केला आहे

त्यामुळे आता सदर या आरोपांमुळे राम मंदिरासह सदर जागा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे याबाबत काय निर्णय होतो हे येणाऱ्या काळातच समजणार आहे




आता 'त्या' जागेवरून नवा वाद...तालुकाध्यक्षांना पदावरून हटवण्याची मागणी! आता 'त्या' जागेवरून नवा वाद...तालुकाध्यक्षांना पदावरून हटवण्याची मागणी! Reviewed by Prashasak on जून १०, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.