त्यांच्यावर कारवाई करा....अन्यथा पोलीस ठाण्यासमोरच...'त्या' जागेचा वाद विकोपाला!


प्रशासक न्यूज,दि.१२जून२०२५

श्रीगोंदा शहरातील बाजारतळावरील श्रीराम मंदिराच्या जागेवरून सुरु झालेला वाद काही करून शमण्याची चिन्हे दिसत नाहीत सदर राममंदिर हे बेकायदेशीर असून श्रीराम मठाच्या जागेत ते न बांधता शिवसेना तालुकाध्यक्ष नंदकुमार ताडे यांनी मंदिराच्या नावाखाली जागा बळकावण्यासाठी ते मंदिर दुसऱ्या जागेत बांधल्याचा आरोप बापू माने यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन गेला होता त्याला प्रत्यूत्तर देण्यासाठी आज नंदकुमार ताडे यांनी श्रीराम मंदिरात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते त्या पत्रकार परिषदेसाठी त्यांचा मुलगा शिवराज ताडे,पत्नी सौ.वैशाली ताडे, प्रताप ताडे,काळुराम ताडे,प्रकाश ताडे,सुरेश आळेकर,शिवसेना जिल्हाध्यक्षा मीराताई शिंदे हे उपस्थित होते

यावेळी ताडे यांनी साडेतीनशे वर्षांपासून बाजार तळावरील संबंधित जागेवर राममंदिर असल्याचे सांगत त्याबाबतचे पुरावे दाखवत ६२वर्षांपूर्वी श्रीराम मंदिराची धर्मादाय आयुक्ताकडे नोंद झाल्याचे त्यांनी सांगितले तसेच २०मे १९१९चे खरेदी खतात सर्व्हे नं १२०७मध्ये श्रीराम मठाची जागा असा उल्लेख असलेले खरेदी खत दाखवत त्याचाच सर्व्हे नं ऐवजी आता गट नं ११२१असा बदल झाल्याचे ताडे यांनी सांगितले त्यामुळे ही जागा राममंदिराचीच असे त्यांनी ठणकावून सांगितले

*श्रीरामाच्या मंदिरासाठी लेटरपॅड चा वापर*

शिवसेनेच्या लेटरपॅड चा गैरवापर केल्याच्या आरोपाला उत्तर देताना ताडे म्हणाले की राम मंदिराच्या कामासाठी मी लेटरपॅड वापरले माझ्या व्यक्तिगत कामासाठी वापरले नाही उलट बापू माने हे विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे यांचे बॅनर लावून त्यांच्या नावाचा गैरवापर करून दहशत निर्माण करून जागा बळकवत असल्याचा आरोप ताडे यांनी केला

*त्यांना तडीपार करा*

बापू माने यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत ते नेहमीच गरिबांच्या जागा लुबाडण्यासाठी तयार असतात जागा बळकवण्यावरून त्यांचे अनेक ठिकाणी वाद झाले आहेत माने हे दहशत पसरवत असून महंमद महाराज मंदिरात जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाचा ओझूखाना माने यांनी बांधून देऊन ते हिंदू मुस्लिम असा धार्मिक तेढ निर्माण करत आहेत तसेच महंमद महाराज मंदिर निर्माणात अडथळा आणण्यासाठी ते दर्गाह ट्रस्टीना चुकीचे मार्गदर्शन करून हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करत आहेत त्यामुळे गुंडप्रवृत्तीच्या माने यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्याची मागणी नंदकुमार ताडे यांनी केली

*अन्यथा पोलीस स्टेशनसमोर अन्नत्याग आंदोलन*

माने हे जागा बळकवण्यासाठी घरा घरात वाद लावत आहेत आपल्या मुलाला देखील त्यांनी २०गुंठे जागा नावावर करून देण्याचे आमिष दाखवत माझ्याच विरोधात मुलाला फूस लावली होती परंतु सदर जागा रामाची असल्याचे आपण मुलाला समजावल्याचे ताडे म्हणाले तसेच माझ्या केसाला धक्का लागला तरी त्याला बापू माने जबाबदार असतील याबाबत श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास पुढच्या आठवड्यात श्रीगोंदा पोलीस स्टेशनसमोर आपण अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे ताडे यांनी सांगितले

फटाका विक्रेत्यांकडून सदर जागेत दुकानें लावण्यासाठी आपण पैसे घेतो या आरोपचे खंडण करत या विक्रेत्यांकडून आपण आजपर्यत एक ही रुपया भाडे घेतलेले नाही उलट दुकान लावण्याच्या मोबदल्यात सदर दुकानदारांनी राममंदिर बांधण्यासाठी मोठा हातभार लावल्याचे ताडे यांनी सांगितले

सर्व्हे नं १२०७चा गट नं ११२१ हा श्रीगोंदा नगरपरिषदेच्या विकास योजना आराखड्यात आरक्षण क्रं ३३नुसार बाजारतळ व शॉपिंग सेंटरसाठी आरक्षित आहे तसेच सदर मिळकत ही ट्रस्ट मिळकत आहे असे असताना सुद्धा चंद्रनंदन ताडे यांनी बापू माने यांचे नावे कोणत्याही क्षेत्राचा उल्लेख न करता खरेदीखत करून दिले ते बेकायदेशीर आहे याबाबत दुय्यम निबंधक कार्यालयात पुरव्यांनीशी अर्ज देऊन सुद्धा प्रभारी दुय्यम निबंधक जी व्ही तारगे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे ताडे,माने आणि तारगे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याबाबत नंदू ताडे यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला अर्ज दीला आहे

या आरोप प्रत्यरोपांमुळे श्रीगोंदा शहरात जागेची बोगस खरेदी विक्री कशी होते हे आता समोर येत आहे

त्यांच्यावर कारवाई करा....अन्यथा पोलीस ठाण्यासमोरच...'त्या' जागेचा वाद विकोपाला! त्यांच्यावर कारवाई करा....अन्यथा पोलीस ठाण्यासमोरच...'त्या' जागेचा वाद विकोपाला! Reviewed by Prashasak on जून १२, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.