प्रशासक न्यूज,दि.१५जून२०२५
सध्या विवाह जमवताना नोकरी,राहण्याची व्यवस्था याला महत्त्व दिले जात असल्याने विवाह इच्छुकांचे वय उलटून जात आहे.मात्र श्रीगोंदा शहरात २ अनोखे विवाह सोहळे पार पडले ते निश्चितच कौतुकास्पद म्हटले पाहिजे कारण शहरातील दिलीप श्रीमंदिलकर यांचे १० वर्षापूर्वी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दुर्गाताई,लहान मुले सागर,दत्तात्रय आणि उमेश असा परिवार राहिला दुर्गाताई मोलमजुरी करू लागल्या तर मुले मोठी होताच परिसरातील त्रिमूर्ती भेळ सेंटर मध्ये कामाला जाऊ लागली त्रिमूर्ती भेळ चे संचालक चंद्रकांत चौधरी यांच्या लक्षात आले की प्रामाणिक काम करणाऱ्या दत्तात्रय आणि उमेश यांचा संसार थाटला गेला पाहिजे
पण सागर,दत्तात्रय आणि उमेश यांच्या वाट्याला फक्त वडिलोपार्जित घर मिळाले पण ते सुद्धा २० बाय १२फूट यात तिन्ही भावांचा संसार कसा मांडणार आणि घराची अपुरी जागा पाहून या भावांना लग्नासाठी स्थळ देखील येत नव्हती मग चंद्रकांत चौधरी यांनी रियल इस्टेट व्यावसायिक ॲड.वैभव मेथा यांना २ गुंठे जागा कमी दरात तेही हफ्त्याने देण्याचा प्रस्ताव ठेवला आणि वैभव मेथा यांनी क्षणाचा विलंब न लावता २ गुंठे जागा खरेदी देण्याची तयारी दर्शवली पुढे उमेशचा विवाह साक्षी उर्फ जना येडे हिच्याशी निश्चित करण्यात आला २ गुंठे जागा उमेश आणि साक्षीच्या नावे खरेदी देण्यात आली आणि विवाह सोहळा गेल्या महिन्यात पार पडला दरम्यान काळात जागा मिळाल्याने दुसरा भाऊ दत्तात्रय याचा विवाह देखील भाग्यश्री व्हावळ हिच्याशी निश्चित करण्यात आला आणि तो विवाह सोहळा नुकताच श्रीगोंद्यात पार पडला. सगे सोयरे,जातीतील माणसे जिथे दुर्लक्ष करतात तिथे चंद्रकांत चौधरी आणि वैभव मेथा पुढे आले आणि दोन्ही भावांचे विवाह झाले आज त्यांना जागा मिळाली त्याची उर्वरित रक्कम देण्याची हमी मालक चौधरी यांनी घेतली वैभव मेथा यांनी एका कुटुंबाचा राहण्याचा आणि विवाहाचा प्रश्न सुटत असेल तर यासारखे पुण्य नाही असे समजत सामाजिक बांधिलकीतून ना नफा ना तोटा या दराने जागा दिली जिथे त्या जागेला अधिकची रक्कम तेही रोख मिळत असताना त्यांना न देता श्रीमंदीलकर यांना देण्याचा निर्णय घेतला यावरच ते थांबणार नसून घरकुल योजनेत घराचे बांधकाम होण्यासाठी देखील मेथा पुढाकार घेणार आहेत.
*चौकट*
पैश्यातून मिळणाऱ्या नफ्यापेक्षा दुसऱ्याची मदत करून मिळणारे समाधान मोठे
मोलमजुरी करणाऱ्या कष्टाने खाणाऱ्या युवकांचे विवाह केवळ जागे अभावी तुटू नये या मताचे आपण असल्याने चंद्रकांत चौधरी यांचा प्रस्ताव येताच नफा न पाहता आणि समोर ग्राहक मिळत असताना आपण कमी किंमतीत तेही हफ्त्याने पैसे घेण्याचे ठरवून खरेदी खत करून दिले यामुळे दुसऱ्या भावाचा देखील विवाह शुक्रवारी पार पडला दोन्ही भावांचे दोन हाताचे चार हात झाले याचा मला जागा विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यापेक्षा जास्त समाधान मिळाले - उद्योजक ॲड.वैभव मेथा

श्रीगोंद्यात युवा उद्योजकांनी दिली साथ आणि दोन भावांचे झाले दोनाचे चार हात!
Reviewed by Prashasak
on
जून १५, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: