शिवसेना तालुकाअध्यक्षांचे पितळ उघडे पाडणार.. त्यांनीच बेकायदेशीर घुसखोरी केली!


प्रशासक न्यूज,दि.१५जून२०२५

आमची खरेदी बेकायदेशीर नाही आम्ही खऱ्या वारसदारांकडून जागा खरेदी केली,श्रीराम मंदिराची जागा घेतलेली नाही पण आमच्या खरेदी मुळे या जागेत बेकायदा घुसलेल्या शिवसेना तालुका प्रमुख नंदकुमार ताडे यांचे पितळ उघडे पडणार असल्याने त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा गैरवापर करत स्थानिक प्रशासनावर दबाव आणून आमच्यावर मंदिराची जागा घेतल्याचा आरोप करत आमच्या विरुद्ध वातावरण निर्मितीचा प्रयत्न चालवला असल्याचा आरोप उद्योजक बापू माने यांनी दोन दिवसांपूर्वी श्रीगोंद्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला.

माने म्हणाले नंदकुमार ताडे यांनी राजकीय वरदहस्त वापरून खरे वारसदार बाजूला केले शिवाय प्रतिज्ञापत्र वेगवेगळे सादर केले प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत पण कोर्टात आम्ही दाद मागू, एका प्रतिज्ञापत्रात ताडे म्हणतात मी चुलत बहिणीचा वारस म्हणून मालमत्तेत नाव आले तर दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात म्हणतात ज्या चुलत बहिणीच्या वारसा ने नाव आले तिच्या वडिलांनी म्हणजे चुलत्याने लग्न केलेले नव्हते हि प्रतिद्यापत्रे अडचणीची ठरणार असल्यानेच त्यांनी शिवसेनेच्या पदाचा गैरवापर करण्याचे ठरवून आमच्यावर तडीपार, मोका लावण्याचे सांगत आहेत पण राज्य सरकार कायद्याने चालते याचा विसर ताडे यांना पडला असला तरी आम्ही मात्र कायदेशीर मार्गाने इलाज करणार असून खरे वारसदार चंद्रनंदन ताडे व त्यांच्या भावकीच्या व्यक्तींना न्याय मिळवून देणार आहोत असे स्पष्ट करून माने म्हणाले ताडे यांनी मुंबई ला धावपळ करून आमच्या विरुद्ध तडीपार,मोका लावण्यासाठी दबाव आणण्याऐवजी पोलिस ठाणे,तहसील कार्यालयात कागद पत्र घेऊन या मग समजेल गुन्हा कोणावर दाखल होतो कोणावर कारवाई होते.असे आव्हान देऊन या प्रकरणी आपल्यावर अन्याय झाल्यास आपण मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करून सर्व कागदपत्रे शासनाला समक्ष दाखवू असा इशारा दिला.

यावेळी चंद्रनंदन ताडे व त्यांच्या कुटुंबीयांनी ६० वर्षांपूर्वीचे वाटप पत्र, मूळ वंशज याची माहिती देताना नंदकुमार ताडे यांनी राजकीय दबावातून आम्हाला सातत्याने दूर ठेवत गावकरी आणि प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप करत कायदेशीर मार्गाने लढा देणार असल्याचे स्पष्ट केले.

*चौकट*
बापू माने म्हणाले आम्ही राम भक्त आहोत मंदिर उभारणीत आम्ही मदत केलेली आहे मंदिराच्या जागेला कोणताही अडथळा नाही शिवाय आम्ही आमच्या जागेत हनुमान मंदिर उभारणार आहोत,खऱ्या वारसदारांना न्याय मिळवून देऊन आम्हाला बोगस खरेदी करणारे म्हणणारे बोगस प्रतिज्ञापत्र करून कसे अन्याय करतात हे जगा समोर आणू.
शिवसेना तालुकाअध्यक्षांचे पितळ उघडे पाडणार.. त्यांनीच बेकायदेशीर घुसखोरी केली! शिवसेना तालुकाअध्यक्षांचे पितळ उघडे पाडणार.. त्यांनीच बेकायदेशीर घुसखोरी केली! Reviewed by Prashasak on जून १५, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.