दोन तरुणांचा मृत्यू, श्रीगोंदा तालुक्यातील घटना


प्रशासक न्यूज,दि.१५जून २०२५

नगर दौंड महामार्गावरील अपघातांची मालिका काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत

काल दि.१४जून रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ गावात नगर दौंड रस्त्यावर अज्ञात वाहणाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेमुळे दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी होऊन या अपघातात ते मयत झाले आहेत

दत्तात्रय अनिल सकट वय(२६वर्षे)रा.मांडवगण फराटा,ता.शिरूर,जि.पुणे
दीपक संजय मोरे वय(२९वर्षे)रा.रिसोड,जि. वाशीम अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत

सदर अपघाताबाबत अनिल सकट यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे

सदर अपघाता बाबत समजलेली माहिती अशी की मयत सदर दोन्ही तरुण काल रात्री नगर दौंड रस्त्याने हिरो होंडा स्प्लेंडर क्रं एम एच १२ व्ही एस ८४५०यावरून जात असताना ते लोणी व्यंकनाथ गावा नजीक आले असता एका अज्ञात वाहणाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या धडकेमुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले त्यात त्यांचा मृत्यू झाला धडक देणारा वाहन चालक अंधाराचा फायदा घेऊन वाहनासह पसार झाला

पोलीस वाहन चालकाचा शोध घेत आहेत सदर अपघातात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे












दोन तरुणांचा मृत्यू, श्रीगोंदा तालुक्यातील घटना दोन तरुणांचा मृत्यू, श्रीगोंदा तालुक्यातील घटना Reviewed by Prashasak on जून १५, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.