प्रशासक न्यूज,दि.१७जून २०२५
वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आहे वाहनचालकांच्या सोयीसाठी चांगल्या रस्त्यांची सुविधा शासनाने केलेली आहे परंतु त्या रस्त्यांमुळे वाहनचालकांना वाहनाच्या वेगाचा विसर पडल्याचे दिवसागणिक वाढत चाललेल्या अपघातावरून दिसून येत आहे
अशाच प्रकारे अतिशय प्रचंड वेगाने जाणाऱ्या वाहनाने रस्ताच्या कडेला शेळ्या चारणाऱ्या व्यक्तीला भरदिवसा जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात शेळ्या चारणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा जामखेड रस्त्यावर घायपातवाडी शिवारात घडली आहे
बाजीराव लक्ष्मण दांडेकर रा.गणपती मळा(श्रीगोंदा) वय ७५वर्षे असे या अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे
सदर घटनेबाबत माहिती समजताच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तरटे मेजर हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले पण ही धडक इतकी जोराची होती की सदर व्यक्ती जागेवरच मयत झाली होती
या अपघाता बाबत समजलेली माहिती अशी की सदर मयत दांडेकर हे आज दुपारी शेळ्या चारत असताना श्रीगोंदा जामखेड रस्त्यावर घायपातवाडी शिवारात श्रीगोंद्याकडून आढळगाव च्या दिशेने जाणाऱ्या एम एच १६ डी एम ७०८८या प्रचंड वेगात असलेल्या चारचाकी वाहनावरील अज्ञात चालकाने दांडेकर यांना जोराची धडक दिली ही धडक एवढी जोराची होती की दांडेकर हे उडून रस्त्यावर पडले आणी त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघाता नंतर वाहन चालक वाहन अपघातस्थळीच सोडून पसार झाला आहे
पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेतले असून चालकाचा शोध सुरु आहे
काही प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार दोन वाहने प्रचंड वेगात एकमेकांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती त्यातच दांडेकर यांना जोराची धडक बसून त्यात त्यांचा जीव गेला
दोन दिवसांपूर्वीच लोणी गावात वाहनाच्या धडकेत दोन तरुणांना जीव गमवावा लागलेला असतानाचं आज अश्या प्रकारे एका शेळ्या चारणाऱ्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे
शेळ्या चारणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू... श्रीगोंदा शहरानजीकची घटना!
Reviewed by Prashasak
on
जून १७, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: