प्रशासक न्यूज,दि.२०जून२०२५
श्रीगोंदा शहरातील कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेले रस्ते त्याच्या निर्मितीपासूनच या रस्त्याचा निकृष्ट दर्जा आणि रस्त्यांची ठेकेदारी देताना झालेला मोठा भ्रष्टाचार या आरोपांमुळे कायम वादाच्या चर्चेत राहिले रस्ते झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली त्यावरून अनेकवेळा टीका झाली अनेक वर्तमानपत्रातून सदर रस्त्याच्या कामाबाबत अनेकदा बातम्या प्रकाशित झाल्या पण त्याकडे त्यावेळेस श्रीगोंदा नगरपरिषदेने डोळेझाक केली आणि लोकांचा पैसा पाण्यात गेला
आता सुद्धा अश्याच प्रकारे श्रीगोंदा शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम अतिशय निकृष्ट पद्धतीने सुरु असूनसुद्धा श्रीगोंदा नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे
शहरातील रस्त्यावर अनेक महिन्यांपासून मोठे मोठे खड्डे पडलेले असताना संबंधीत ठेकेदाराने मात्र काल दुपारी ऐन पावसात डांबराचे काही थेंब शिंपडून हे खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला पावसाळा संपेपर्यत खड्ड्यात मोठी खडी आणि मुरूम टाकून रोलिंग करून खड्डे बुजवणे गरजेचे आहे किंवा पाऊस नसेल ऊन पडलेले असेल तेव्हा खड्ड्याचे प्याचिंग करणे जरुरी आहे परंतु तसे न करता ठेकेदाराने वरून पाऊस सुरु असताना खड्ड्यात आतून बाहेरून ओलसर पणा असताना त्यावर डांबरी टिकू शकत नाही हे माहित असून सुद्धा बायपास रस्त्यावरील खड्ड्यात खडी टाकत त्यावर अगदी नाममात्र डांबर टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला खरा पण त्याला चोवीस तास होत नाहीत तोपर्यच आज सकाळी या खड्ड्यातील सर्व खडी रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे अशी निकृष्ट कामे करून जनतेच्या पैश्यांची एकप्रकारे उधळपट्टी सुरु असल्याचे दिसत आहे निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना या ठिकाणी बघायला मिळत आहे रहदारीच्या रस्त्यावर एवढे निकृष्ट काम ठेकेदाराकडून होत असेल तर इतर रस्त्याच्या दुरुस्ती ची अवस्था किती वाईट होईल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही
ऐन पावसात प्याचिंग का?
श्रीगोंदा शहरातील रस्ते अनेक महिन्यांपासून प्रचंड खड्डेमय झालेले आहेत त्यावर पक्के डांबरीचे प्याचिंग पाऊसाळा सुरु होण्याआधीच करणे जरुरी होते तसे झाले नाही काल पाऊस येत असताना संबंधित ठेकेदाराने पाऊस उघडल्यानंतर हे प्याचिंग केले असते तरी चालले असते मग पाऊसातच घाईगडबडीत हे प्याचिंग का केले असे एक ना अनेक सवाल श्रीगोंदेकर जनतेच्या मनात उपस्थित झाले आहेत
एक वर्ष्याचे टेंडर पण दुरुस्ती कितीवेळा?
समजलेल्या माहितीनुसार शहरातील रस्त्यांची दुरुस्ती आणि डागडुजी साठी नगरपरिषदे कडून एक वर्ष्याच्या कालावधीसाठी ठेकेदाराला टेंडर दिले जाते कामाच्या आकारानुसार त्याचे बिल दिले जाते ठेकारदाराने या एक वर्ष्याच्या काळात संबंधित रस्त्याची डागडुजी करणे बंधनकारक असते तसेच डागडुजी केलेला रस्ता पुन्हा खराब झाला त्याला खड्डे पडले तर एक वर्ष्यापर्यत संबंधित ठेकेदाराने हे खड्डे बुजवणे ही त्याची जबाबदारी असते परंतु असं होताना दिसत नाही मग तरी नगरपरिषदेकडून अश्या ठेकेदारांना बिले कशी काय अदा केली जातात हाही मोठा प्रश्न आहे

संबंधित ठेकेदाराने या आधी केलेल्या कामाच्या दर्जाबाबत अनेकदा सवाल उपस्थित झालेले असताना सुद्धा त्याच ठेकेदारावर श्रीगोंदा नगर परिषदेची मेहेरबानी का असा प्रश्न निर्माण झाला आहे
*श्रीगोंदा नगरपरिषदेवर कायदेशीर कारवाई करणार*
अश्या प्रकारे खड्डयाचे भरपावसात प्याचिंग केले प्याचिंग होऊन २४तास सुद्धा झालेले नसतानांचं त्या खड्ड्यातील खडी उचकटून पूर्णपणे रस्त्यावर आली आहे भर रहदारीच्या रस्त्यावर असे निकृष्ट काम ठेकेदार करत आहे तरी नगरपरिषद याबाबत फक्त बघ्याची भूमिका घेत आहे संबंधित ठेकेदाराकडून निकृष्ट काम होत असून पण त्यालाच काम का दिले जात आहे जनतेच्या पैश्याच्या उधळपट्टी बाबत आम्ही पालिकेला कायदेशीर जाब विचारणार असल्याचे ऍड गौरव गाडिलकर यांनी सांगितले
श्रीगोंद्यात निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना...चोवीस तासाच्या आतच खडी रस्त्यावर!
Reviewed by Prashasak
on
जून २०, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: