सामाजिक बांधिलकी जपत वर्धापनदिन साजरा!


प्रशासक न्यूज,दि.२०जून२०२५

कुठलाही तामझाम किंवा गाजावाजा न करता शिवसेनेचा (शिंदे गटाचा)
वर्धापन दिन यंदा श्रीगोंदा तालुका व शहर विभागात समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने देऊळगाव येथील महामानव बाबा आमटे आश्रम शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात शिवसेनेचे(शिंदे गट) उपजिल्हा प्रमुख मनोहर पोटे, तालुका प्रमुख नंदू ताडे, शहर प्रमुख नितीन गायकवाड, जिल्हा प्रमुख मीराताई शिंदे, तालुका संघटिका मीरा खेंडके, शहर संघटिका लीना क्षीरसागर तसेच अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शालेय वस्तू वाटप करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मदत करून समाजातील आपली जबाबदारी निभावण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण ठरला आहे.





सामाजिक बांधिलकी जपत वर्धापनदिन साजरा! सामाजिक बांधिलकी जपत वर्धापनदिन साजरा! Reviewed by Prashasak on जून २०, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.