मालकांनो जागा सांभाळा.... मोक्याच्या जमिनींवर कुणाचा डोळा?


प्रशासक न्यूज,दि.१९मे२०२५


श्रीगोंदा शहरातच नव्हे तर आता संपूर्ण तालुक्यात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा बळकावण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु असल्याची माहिती आता समोर येत आहे मोक्याची जागा गाठायची त्याचा मालक शोधायचा मालक गरीब किंवा त्याला कुणाचा आधार नाही असा किंवा नोकरदार,कष्टकरी असा किंवा बाहेरगावी राहणारा असा मालक शोधायचा कारण त्याची जागा बळकावणे सोप असत किंवा अनेक वर्ष्यापासून पडीक असलेली जागा,जमीन असे शोधायचे त्याचे कागदपत्र बनवायचे असे असले की मग ती जमीन बळकावणे सहज सोपे जाते
मग असं सावज सापडलं की आधी गुंड प्रवृतीच्या लोकांना एखादा कागद घेऊन तिथं पाठवायचं तो कागद दाखवून ही जागा माझीच असे म्हणत त्या जागा मालकाला जागा खाली करण्यासाठी धमकवायचे तरी तो मालक ऐकत नसेल तर मग एकदम प्रभावी अस्त्र म्हणून मग विशिष्ट समाजातील लोक तिथं त्या जागेवर आणायची आणि त्या जागेवर त्यांना ठाण मांडून राहायला लावायचं मग हे लोक ही जागा आम्हीच विकत घेतली तु बाहेर निघ असं जागा मालकाला धमकवतात त्यानंतर मालक घाबरून वैतागून गेला की परत त्याच्याच मालकीची जागा सोडण्यासाठी किंवा त्या जागेतून बाहेर जाण्यासाठी त्याच्याकडेच लाखो रुपयांची पैश्यांची मागणी करायची असे प्रकार अनेक ठिकाणी घडतं आहेत
परंतु खोटे गुन्हे दाखल होण्याच्या भीतीपोटी,बदनामी पोटी तसेच समोरून गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून येणाऱ्या धमकीमुळे अनेकजण शांत राहणे किंवा तडजोड करून ठराविक रक्कम पदरात पाडून घेऊन त्या जागेचा मालकी हक्क सोडणे असा पर्याय अवलंबत आहेत त्यामुळे अश्या प्रकारे बेकायदेशीर पद्धतीने जागा बळकावण्याचे प्रकार आणि या टोळीची हिंमत वाढत आहे

*जमीन तस्करीचा नवा व्यवसाय,टोळी सक्रिय *

वाळू तस्कर,चंदन तस्कर याप्रमाणे आता हे अश्या प्रकारे दमदाटी करून गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन जागांची, जमिनीची तस्करी करणारी टोळीच आता सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत असून या टोळीत अनेक जण सहभागी आहेत प्रत्येकाला ज्याची त्याची जबाबदारी नेमून दिली असून त्या बदल्यात प्रत्येकाला मोठा मोबदला दिला जातो जागा बळकवण्याचे काम संघटित पणे सुरु असून काही मोहरे पुढ राहून काम करतात तर काही पडद्यामागे राहून ही सूत्रे हालवतात यात सगळेच मालामाल होत असल्यामुळे मोक्याच्या जागा हेरून त्यांची तस्करी करणाऱ्या टोळ्या आता सक्रिय झाल्यामुळे जागा मालकांनी आपल्या जागा सांभाळणे गरजेचे आहे

*अन्याय सहन न करता कायद्याची मदत घेणे गरजेचे*

अश्या प्रकारे जर कुणी गरीब लोकांना त्रास देऊन धमकावून त्यांची जागा,जमीन हडप करण्याचा प्रयत्न करत असेल तर संबंधित लोकांनी अजिबात न घाबरता कुठल्याही दबावला बळी न पडता कायद्याची मदत घ्यावी अश्या प्रकारे संघटित पणे कुणी कुणाला धमकावत असेल तर अश्या लोकांवर माकोका कायद्यानुसार कारवाई करता येते असे देखील कायदे तज्ञाचे मत आहे त्यामुळे अश्या प्रकारे बेकायदेशीर जमिनीची ताबेमारी प्रकरणात लोकांनी आता जागरूक होऊन या विरोधात लढा देणे गरजेचे आहे

*पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन कारवाई करणे गरजेचे*

अश्या प्रकरणात काही पीडित लोक तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला गेल्यावर पोलीस ही आमची जबाबदारी नाहीत असं सांगून जबाबदारी झटकतात परंतु पोलिसांनी देखील अश्या प्रकरणात गंभीर्याने लक्ष घालून अश्या प्रकारच्या तक्रारी पोलीस स्टेशनला आल्यावर त्या लोकांच्या तक्रारी घेऊन खऱ्या खोट्याचा सोक्षमोक्ष लावून असे जर खरच कुणी कुणाला धमकावून त्याच्या जागेतून त्याला बाहेर काढण्यासाठी दबाव टाकत असेल जागा बळकावत असेल तर त्या लोकांनविरोधात तात्काळ कडक कारवाई करणे जरुरी आहे
लोकांचा एकत्रित लढा आणि पोलिसांची कारवाई झाली तरच या ताबेमारी करणाऱ्या टोळ्यांना पायबंद बसेल अन्यथा येणाऱ्या काळात सर्वांनाच याचा फटका बसल्या शिवाय राहणार नाही

मालकांनो जागा सांभाळा.... मोक्याच्या जमिनींवर कुणाचा डोळा? मालकांनो जागा सांभाळा.... मोक्याच्या जमिनींवर कुणाचा डोळा? Reviewed by Prashasak on मे १९, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.