प्रशासक न्यूज,दि.१८मे २०२५
आधीच रीतसर खरेदी झालेल्या जागांवर बोगस खरेदीखत किंवा एखादी नोटरी करायची आणि नंतर त्या जागा मालकाला जाऊन सदर जागा आमचीच असं म्हणत तिथून बाहेर पडा असे सांगून दमदाटी करायची आणि तेवढं करून त्या जागा मालकांनी ऐकलं नाहीतर मग विशिष्ट समाजातील लोकांना ठराविक रक्कम देऊन त्यांना पुढ करून त्या जागेत त्यांना ठाण मांडून बसवायचं मग या लोकांकडून संबंधित जागा मालकाला बलात्कारासह विविध खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी द्यायची आणि त्याच्या हक्काची जागा त्याला सोडायला भाग पाडायचं अश्या घटना श्रीगोंदा शहरात नव्हे तर तालुक्यात आणि तालुक्याच्या बाहेर अनेक ठिकाणी सर्रास घडतं आहेत
पण अश्या प्रकारांना बळी पडणारे काही लोक नोकरदार काही गरीब तर काही कष्टकरी असल्यामुळे असल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांसोबत कुणी पंगा घ्यायचा परत वरून विशिष्ट समजाच्या लोकांना मध्ये घालून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी यामुळे अनेक जागा मालक या प्रकारामुळे धास्तावले आहेत आणि भीतीने शांत राहणेच पसंत करत आहेत
काहींठिकाणी तर कोट्यावधी रुपये किंमतीची जागा असल्या लोकांच्या दहशतीपोटी काही लाख रुपयात विकल्याची तर काही ठिकाणी लाखो रुपये किंमतीची जागा कवडीमोल भावात विकल्याच्या घटना देखील समोर येत आहेत
*खरेदी विक्री प्रकरणावरच संशय*
एकाच जागेवर अनेकांनी दावा केल्यामुळे एकाच जागेची अनेकदा खरेदी कशी होते नोटरी कशी होते अशी चर्चा आता होत असून एकाच जागेची मुळ खरेदीदारा व्यतिरिक्त दावा सांगणाऱ्या व्यक्तींकडे खरेदीखत असले तरी त्यात अनेक गोष्टी संशयास्पद असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आता अश्या प्रकारे जागेच्या होणाऱ्या खरेदी विक्रीच्या प्रकरणाबाबतच संशय बळावला आहे
एकाच जागेवर अनेकांनी दावा केल्यामुळे एकाच जागेची अनेकदा खरेदी कशी होते नोटरी कशी होते अशी चर्चा आता होत असून एकाच जागेची मुळ खरेदीदारा व्यतिरिक्त दावा सांगणाऱ्या व्यक्तींकडे खरेदीखत असले तरी त्यात अनेक गोष्टी संशयास्पद असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आता अश्या प्रकारे जागेच्या होणाऱ्या खरेदी विक्रीच्या प्रकरणाबाबतच संशय बळावला आहे
*बातमी नंतर अनेकांचा संपर्क*
काल प्रशासक न्यूज पोर्टल ने श्रीगोंदा शहरात सुरु झालेल्या ताबेमारीच्या गंभीर प्रकाराबाबत बातमी प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित प्रतिनिधीला अनेकांनी संपर्क करून आपल्याबाबत देखील असा प्रकार घडतं आहे घडून गेला आहे असे सांगितले तसेच याबाबत पोलिसांकडे न्याय मागून सुद्धा उपयोग झाला नसल्याची खंत सुद्धा काही लोकांनी व्यक्त केली
*ते लोक फक्त मोहरा.. खरे सूत्रधार वेगळेच*
अश्या प्रकारे मोक्याच्या जागा गिळंकृत करण्यासाठी शहरातील शहराबाहेरील काही लोक अश्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आणि या विशिष्ट समाजातील लोकांना पुढ घालून जागा मालकांना धमकावंत आहेत दमदाटी करणारे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणारे हे लोक काही हजार रुपये रक्कम घेऊन फक्त कामाला आहेत परंतु यांच्याकडून हे काम करून घेणारे खरे सूत्रधार मात्र पडद्यामागे राहून ही ताबेमारीची सूत्रे हालवत आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांचा बुरखा फाडून समाजासमोर आणणे जरुरी आहे
*सगळ्या प्रकरणात मिलिभगत असण्याचा अनेकांना संशय*
ताबेमारीच्या या प्रकरणात काही धंनदांडग्या लोकांसोबतच राजकीय क्षेत्रातील काही लोक प्रशासनातील काही व्यक्ती या सर्वांची मिलिभगत असण्याचा संशय या ताबेमारीला बळी पडलेल्या लोकांकडून व्यक्त होत आहे त्यातच पोलीस या प्रकरणात अजिबात सहकार्य करत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा संशय व्यक्त होत आहे
त्यामुळे ही वेळ कुणावर पण येऊ शकते हे लक्षात घेऊन या असल्या प्रकारा विरोधात सामूहिक लढा उभारणे गरजेचे आहे
खोट्या गुन्ह्याचा दाखवून धाक...मोक्याची जागा घातली जातेय घशात,'त्या' प्रकाराची व्याप्ती मोठी!
Reviewed by Prashasak
on
मे १८, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
मे १८, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: