आमचा विरोध नाही,ते आरोप खोटे,उलट ते निर्णय कमिटीलाच मान्य नाहीत.... शेख यांचे स्पष्टीकरण!


प्रशासक न्यूज,दि.१८एप्रिल२०२५

शेख महंमद महाराज देवस्थान जीर्णोद्धारास आमचा कधीच विरोध नव्हता व नाही, सन १९८० साली मा.आ. बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून देवस्थान शुभोभीकरणाचे काम करण्यात आले. त्या नंतर राहुल जगताप आमदार असताना त्यांनी शेख महंमद महाराज देवस्थान च्या आत पेव्हिंग ब्लॉक व हायमॅक्स दिवा बसविण्यात आला. त्यानंतर मा. खा. सुजय विखे पा.व मा. मंत्री बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नातून देवस्थानाच्या सुशोभिकरणासाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. या निधितून बाहेरील पटागंणात पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले. व आत मध्ये विविध विकास कामे करण्यात आले. तसेच लोक वगर्णीतुन देखील ट्रस्ट च्या माध्यमातून विविध विकास कामे करण्यात आले. आम्ही कधीही विकास कामास विरोध केला नाही. आम्ही देवस्थान जिर्णोधार विकास कामास विरोध करत आहोत हा आरोप खोटा आहे. तसेच शेख महंमद महाराज यांच्या समाधीवर दररोज अर्पण करण्यात येणार शेरा व दर गुरुवारी होणारे अन्नदानास आम्ही विरोध केला हा आरोप देखील खोटा असल्याचे शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट चे अध्यक्ष आमीन शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे

दि.१६ रोजी शेख महंमद बाबा देवस्थान जिर्णोधार होणे कामी श्रीगोंदा तहसिल कार्यालयात आमदार विक्रमसिंह पाचपुते व प्रशासकीय अधिकारी पोलीस उपअधिक्षक मिलिंद वाखारे, प्रातांधिकारी श्रीनिवास चिंचकर, पोलीस निरिक्षक किरण शिंदे, मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत मॅडम, नायब तहसिलदार नेवसे या प्रशासकीय अधिकाऱ्यां सोबत आमची बैठक संपन्न झाली. या बैठकीत शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट च्या नावात बदल करुन शेख महंमद बुवा देवस्थान करावे अशी सुचना आम्हाला करण्यात आली ही सुचना आम्ही मान्य केली. २) देवस्थान जिर्णोधार काम करण्यासाठी ट्रस्ट च्या मान्यतेने एक शासकीय समिती स्थापन करावी लागेल त्याकामी ट्रस्ट ची नाहरकत द्यावी लागेल, या शासकीय समितीत विद्यमान आमदार, तहसिलदार, पोलीस निरिक्षक, नगरपरीषद मुख्याधिकारी, सार्वजनीक बांधकाम उप अभियंता, ट्रस्ट च्या वतीन व यात्रा कमेटीच्या वतीने एक-एक सदस्य राहील असे एकुण सात सदस्याची समिती राहील. ही समीती स्थापण करण्यासाठी ट्रस्ट च्या वतीने बैठकीत मान्यता देण्यात आली. ३) शेख महंमद बाबा यांचे वंशज, पुजारी यांची निवासस्थाने देवस्थानच्या जागेतच बांधुन देण्यात येईल. ४) कोर्टात देवस्थानच्या बाबत असलेले सर्व दावे ट्रस्ट मागे घ्यावीत व यात्रा कमेटीच्या वतीने देखील कोर्टात असलेले दावे माघे घेण्यात येईल असे बैठकीत ठरवण्यात आले. परंतू बैठकीत ठरवण्यात आलेले विषय यात्रा कमिटी लाच मान्य नसल्याचा उलट आरोप शेख यांनी या प्रसिद्धी पत्रकात केला आहे

सर्व कायदेशीर बाबी असताना सुद्धा शेख महंमद महाराज देवस्थान चा जिर्णोधार कायदेशीर पद्धतीने सर्वांना बरोबर घेवून करणार असल्याचे आमीन शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

आमचा विरोध नाही,ते आरोप खोटे,उलट ते निर्णय कमिटीलाच मान्य नाहीत.... शेख यांचे स्पष्टीकरण! आमचा विरोध नाही,ते आरोप खोटे,उलट ते निर्णय कमिटीलाच मान्य नाहीत.... शेख यांचे स्पष्टीकरण! Reviewed by Prashasak on एप्रिल १८, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.