प्रशासक न्यूज,दि.१८एप्रिल२०२५
श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत आणि संपूर्ण तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या संत शेख महंमद महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धा रात अडथळा ठरणारे शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट तातडीने बरखास्त करून मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर कालपासून सुरु असलेले बेमुदत धरणे आंदोलन आजही सुरूच आहे संत शेख महंमद महाराज यात्रा कमिटी आणि समस्त गावकरी यांनी हे आंदोलन सुरु केले आहे तसेच कालपासून बेमुदत गावबंद ठेवण्यात आले आहे त्याला आजही श्रीगोंद्यातील व्यापाऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असून सलग दुसऱ्या दिवशी श्रीगोंदे कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे शहरातील व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय,व्यवहार सलग दुसऱ्या दिवशी बंद ठेवून मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या मागणीसाठी पुकारलेल्या बेमुदत बंदला पाठींबा दिलेला आहे
लोकांचा या बेमुदत धरणे आंदोलनाला मोठा पाठींबा मिळत आहे फक्त शहरातीलच नव्हे तर तालुक्यासह बाहेरच्या तालुक्यातून देखील लोक आंदोलनस्थळी येऊन पाठींबा दर्शवत आहेत तसेच याठिकाणी दिवसभर भजन, कीर्तन,भारूड,पोवाडे विविध देशभक्ती पर गीतांचे सादरीकरण करण्यात येत आहे
आंदोलनस्थळी उपस्थित लोकांसाठी जेवण नाश्त्याची सोय करण्यात आली आहेसदर आंदोलनाबाबत प्रशासनाची काय भूमिका आहे यावर कसा तोडगा काढणार याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रांताधिकारी चिंचकर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही त्यामुळे आता श्रीगोंदेकर ग्रामस्थांनी मंदिर निर्माणासाठी सुरु केलेल्या या आंदोलनावर कधी आणि कसा तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
*मंदिराचा जीर्णोद्धार झालाच पाहीजे हीच सर्वांची तीव्र ईच्छा*
शेख महंमद महाराज हे सर्व हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे त्यांच्या मंदिराची मोठी दुरावस्था झालेली आहे मंदिराचे बांधकाम व्हावे म्हणून अनेक दानशूर लोकांनी मोठी वर्गणी जमा केलेली आहे आणि मंदिराच्या कामासाठी अनेकांची मदत करण्याची ईच्छा आहे परंतु सदर दर्गाह ट्रस्ट या कामात खोडा घालत असल्याचे यात्रा कमिटी सांगत आहे त्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार रखडत आहे परंतु आता अनेक दिवसांपासून मंदिर आणि दर्गाह ट्रस्ट यांच्यातील वादावर तोडगा काढत मंदिर निर्माणातील सदर अडथळे बाजूला करून महाराजांचे हे मंदिर कुठल्याही परिस्थितीत झालेच पाहिजेत हीच भाविकांची तीव्र ईच्छा आहे त्यासाठी सर्वजण आक्रमक आहेत
*बंद बाबत आज संध्याकाळी निर्णय होण्याची शक्यता*
मागील दोन दिवसांपासून श्रीगोंदा शहर बंद ठेवण्यात आलेले आहे या बंदमुळे सामान्य नागरिकांचे होत असलेले हाल आणि व्यापाऱ्यांचे होणारे मोठे नुकसान टाळण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन असेच सुरु ठेवत फक्त गाव बंदचा निर्णय मागे घेण्याबाबत आज संध्याकाळ पर्यत निर्णय होण्याची श्यक्यता व्यक्त होत आहे
तोडगा निघेना,भक्तीमय वातावरणात आंदोलन सुरूच,दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद!
Reviewed by Prashasak
on
एप्रिल १८, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
एप्रिल १८, २०२५
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: