प्रशासक न्यूज,दि.२९मार्च२०२५
आम्ही डिपार्टमेंटची माणसे आहोत आम्हाला एवढा पत्ता सांगा असे म्हणत एका व्यक्तीला भरदिवसा लुटल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावात घडली आहे याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहेसदर घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की,बेलवंडी गावातील हिरवेवस्ती येथील राहणारे मारुती गेणा हिरवे हे दोन दिवसांपूर्वी म्हणजेच दि.२७रोजी सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून प्रथमेश मॉल च्या बाजूने बेलवंडी गावाकडे येत असताना हिरवे हे मराठी शाळेजवळ आले असता त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या ३० ते ३२ वर्ष्याच्या दोन अनोळखी इसमांनी हिरवे यांना थांबवून आम्ही डिपार्टमेंटची माणसे आहोत आम्हाला एवढा पत्ता सांगा असे म्हणत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एक इसम खाली उतरला त्याने हिरवे यांचे पाठीमागून हात धरले आणि दुसऱ्या व्यक्तीने हिरवे यांच्या हाताच्या बोटातील दोन तोळे वजनाची ४५हजार रुपये किंमतीची सोन्याची आंगठी बोटाला व्हॅसलीन लावून काढून घेत तिथून पळ काढला अचानक घडलेल्या या घटनेमुळे हिरवे पुरते गोंधळून गेले त्यानंतर त्यांनी बेलवंडी पोलीस ठाणे गाठत दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला
भरदिवसा गावाच्या जवळ अश्या प्रकारे डिपार्टमेंटची माणसे असल्याचे सांगत वृद्ध व्यक्तीला लुटल्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे बेलवंडी पोलीस पुढील तपास करत आहेत
आम्ही डिपार्टमेंटची माणसे आहोत असे म्हणत भरदिवसा....श्रीगोंदा तालुक्यातील प्रकार!
Reviewed by Prashasak
on
मार्च २९, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: