प्रशासक न्यूज,दि.२७मार्च२०२५
विशाल अ चव्हाण
श्रीगोंदा शहर आणि तालुका सध्या एका वेगळ्याच विषयामुळे जिल्ह्यात गाजतोय तो म्हणजे इथली भ्रष्ट झालेली शासकीय यंत्रणा आणि या शासकीय यंत्रणे भोवती दलालांनी टाकलेला वेढा यामुळे गोरगरीब सामान्य लोकांना वारंवार किरकोळ कामासाठी शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत
मागील काही दिवसांपासून श्रीगोंद्याच्या विविध शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराची विविध प्रकरणे समोर येत आहेत मागील काही दिवसांपूर्वीच श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी सात हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडला ते प्रकरण ताजे असतानाच आपल्या अधिकारांचा गैरवापर करत शासकीय जमिनीची खासगी संस्थेला परस्पर विक्री केल्याच्या प्रकरणात श्रीगोंदा तहसीलदार आणि नायब तहसीलदार या दोघांना निलंबीत करण्यात आले या दोघांच्या निलंबनाची बातमी सोशल मिडीयात फिरत असतानाच त्याच तहसील कार्यालया शेजारी असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयातील खताळ नावाच्या अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले एकाच दिवशी श्रीगोंद्यात भ्रष्ट कारभाराची तीन प्रकरणे समोर आली त्यामुळे श्रीगोंद्यातील शासकीय कार्यलये सध्या भ्रष्टाचाराने बरबटून गेल्याचे चित्र आहे
सदर कार्यलयातील ही प्रकरणे समोर आली म्हणून त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झाली परंतु आज सुद्धा अनेक शासकीय कार्यलयातील अधिकारी कर्मचारी सामान्य लोकांची पैश्यांसाठी अडवणूक करतात परंतु सामान्य लोक सुद्धा आपल्याला काय करायचंय असं म्हणत या भ्रष्ट शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याविरोधात तक्रार देण्यास समोर येत नाहीत त्यामुळे अनेक भ्रष्ट कर्मचारी अधिकाऱ्यांचा भ्रष्ट कारभार झाकून राहत आहे तसेच लोकांच्या या बघ्याच्या भूमिकेमुळे शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचारची ही पाळेमुळे दिवसेंदिवस खोलवर रुजत चालली आहेत आणि ते लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे
लाचलुचपत विभागाच्या सतत कारवाया होऊन सुद्धा शासकीय कार्यालयातील कर्मचारी सुधरायला तयार नाहीत इथून मागच्या काळात सुद्धा जलसंपदा विभाग पोलीस महसूल विविध खात्यात पैसे घेताना कर्मचारी अधिकारी रांगेहाथ सापडलेले आहेत आणि हे प्रकार वाढतच आहेत परंतु याला आळा बसताना दिसत नाही
*काही शासकीय लोकांना पैसे खाण्याचा भसम्या*
शासनाकडून मोठ्या रकमेचा पगार मिळत असूनसुद्धा समाधान न मानता फक्त पैसे खाण्यासाठी शासकीय कर्मचारी आणि अधिकारी हे सामान्य लोकांना त्रास देतात एकप्रकारे पैसे खाण्याचा भस्म्या रोग हा शासकीय कार्यालयातील काही लोकांना जडला आहे त्यामुळे सामान्य नागरिकांची मोठी अडवणूक होत असून कामात प्रचंड संथपणा आला आहे
शासनाकडून मोठ्या रकमेचा पगार मिळत असूनसुद्धा समाधान न मानता फक्त पैसे खाण्यासाठी शासकीय कर्मचारी आणि अधिकारी हे सामान्य लोकांना त्रास देतात एकप्रकारे पैसे खाण्याचा भस्म्या रोग हा शासकीय कार्यालयातील काही लोकांना जडला आहे त्यामुळे सामान्य नागरिकांची मोठी अडवणूक होत असून कामात प्रचंड संथपणा आला आहे
*अधिकारी कर्मच्याऱ्यांवर कुणाचाच धाक नाही*
शासकीय कार्यलयात पैश्यासाठी होणारी लोकांची अडवणूक पैसे घेण्याचे होत असलेले प्रकार असे असूनसुद्धा याबाबत नेमकी दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न लोकांना पडला आहे शासकीय कार्यलयाच्या कारभारावर कुणाचाच अंकुश नसल्यामुळे या प्रकारांना खतपाणी भेटत आहे
*दलालांचा झालेला सूळसुळाट*
श्रीगोंद्याच्या शासकीय कार्यालयात अनेक दलालांचा सुळसुळाट झाला आहे त्यामुळे जर कोणते काम करून घ्यायचे असेल तर दलालाची मदत घ्यावी लागत आहे दलालामार्फत गेल्यास अधिकारी कर्मचारी लवकर काम करून देतात अन्यथा सामान्य लोकांची मुद्दाम कामे प्रलंबीत ठेवली जातात त्यामुळे सामान्य जनता आणि शासकीय कर्मचारी यांच्यात थेट संवाद होणे गरजेचे आहे हा दलालांचा शासकीय कार्यलया भोवती पडलेला विळखा सोडवणे गरजेचे आहे
*चांगल्या काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची कायम आठवण*
श्रीगोंद्यात कार्यरत असताना अनेक अधिकाऱ्यांनी चांगले काम केले अश्या कार्यक्षम अधिकाऱ्यांना श्रीगोंदेकर जनतेने डोक्यावर घेतले हे अधिकारी आपल्या कामामुळे आज सुद्धा श्रीगोंदेकर जनतेच्या आठवणीत आहेत त्यामुळे फक्त पैसे कमावण्यासाठी क्रीम पोस्टिंग म्हणून श्रीगोंद्यात न येता आपली जबाबदारी पार पाडत सामान्य नागरिकांची कामे करण्यास अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रधान्य देणे जरुरी आहे
भ्रष्टाचाराने बरबटत चाललेली श्रीगोंद्यातील शासकीय यंत्रणा आणि दलालांचा झालेला सुळसुळाट!
Reviewed by Prashasak
on
मार्च २६, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
मार्च २६, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: