प्रशासक न्यूज,दि.२६मार्च२०२५
श्रीगोंद्यातील शासकीय कार्यालये सध्या भ्रष्टाचाराचा अड्डा बनल्याचे चित्र श्रीगोंद्यात घडतं असलेल्या वेगवेगळ्या घटनानवरून दिसून येत आहे सात हजारांची लाच घेताना एक पोलीस कर्मचारी रंगेहाथ पकडल्याची घटना ताजी असतानाच आज श्रीगोंदा दुय्यम निबंधक श्रेणी १चा भ्रष्ट आणि लाचखोर अधिकारी सचिन पांडुरंग खताळ हा आज ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ सापडला आहे अहिल्यानगर येथील लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली
खताळ वर कारवाई झाल्यानंतर अनेकांनी समाधान व्यक्त करत आपल्याला सुद्धा खताळ याने पैश्या साठी कसा त्रास दिला याचे किस्से अनेकांनी सांगितले
आज झालेल्या कारवाई बाबत लाच लुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार सदर प्रकरणात तक्रारदार हे वकील असून जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. तक्रारदार यांनी स्वतः व इतर 27 यांनी श्रीगोंदा येथील गट नंबर 1171 मधील 5 हेक्टर 68 आर क्षेत्रापैकी 28 आर जमीन विकत घेतली होती. त्याचा दस्त दिनांक 28/2/ 2025 रोजी केलेला होता. त्यानंतर आज दि.26/3/2025 रोजी तक्रारदार तसेच त्यांचे पार्टनर यांनी श्रीगोंदा येथील गट क्रमांक 1171 मधील 20 आर क्षेत्रापैकी त्यांचे पार्टनर यांचे अविभाज्य हिस्यlची पूर्ण विक्रीचे 1 आर क्षेत्र दुसऱ्यांना 50,000/- हजार रुपये विक्री केल्याबाबतचा दस्त नोंदविण्याकरता तक्रारदार यांना दुय्यम निबंधक कार्यालयात देण्याकरता त्यांच्याकडे दिला होता. त्यावेळी तक्रारदार यांनी सदर चा दस्त दुय्यम निबंधक खताळ यांच्याकडे दिला. त्यावेळी खताळ यांनी आजच्या दस्ताचे 5000/- रुपये व दिनांक 28/2/2025 रोजी नोंदविलेल्या दस्ताचे 10,000/- रुपये लाच मागणी केल्याबाबतची तक्रार दि.26/03/2025 रोजी ला.प्र.वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने दि.26/03/2025 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक सचिन पांडुरंग खताळ यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष तक्रारदार यांना तुमच्या दिनांक 28/2/2025 रोजी दस्ताचे पैसे तुमचे पार्टनर देतील तुम्ही आजच्या दस्ताचे तुम्ही तुमच्या हिशोबाने द्या असे म्हणून लाचेची मागणी केली आहे. दि.26/03/2025 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय श्रीगोंदा येथे आयोजित सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक सचिन पांडुरंग खताळ, दुय्यम निबंधक यांनी तक्रारदार यांचे कडून 5,000/- रुपयाची लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे
श्रीगोंद्यात लाचलुचपतची आणखी एक कारवाई,लाचखोर क्लास वनअधिकारी रंगेहाथ सापडला!
Reviewed by Prashasak
on
मार्च २६, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: