गोवंश हत्या बंदी कायदा महाराष्ट्रात लागू असताना सुद्धा अनेक भागात गोवंश तस्करी आणि गोहत्या सुरु आहेत परंतु श्रीगोंदा पोलीस स्टेशनला अशा गोवंशाची तस्करी केल्याबद्दल आणि गोररक्षकांवर दगडफेक करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शिवसेना(ठाकरे गट)उपनेते साजन सदाशिव पाचपुते यांच्या विरोधातच गुन्हा दाखल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहेश्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव शिवारात काल ही घटना घडली असून आज याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला अक्षय राजेंद्र कांचन वय २५ राहणार उरुळी कांचन,जिल्हा(पुणे)यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १) मुस्तफा कुरेशी,२)इब्राहिम कुरेशी, ३)आतिक कुरेशी,तिघे रा.श्रीगोंदा,४)साजन सदाशिव पाचपुते रा.काष्टी,ता.श्रीगोंदा, 5)महेश चव्हाण 6) शारदा महेश चव्हाण 7) श्री.शिंदे हे रा. कोकणगाव, ता. श्रीगोंदा,यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोकणगाव शिवारातून गोरक्षकांच्या मदतीने पोलिसांनी १४जर्शी गाईंची सुटका केली आहे
काल सदर ठिकाणी यातील आरोपी यांनी संगनमताने आर्थिक लाभापोटी गोवंशाचे हाल करुन त्यांना कोणत्याही चारा पाण्याची व्यवस्था न करता त्यांना दोरीने बांधुन ठेवुन त्यांची कोणत्याही प्रकारची मेडिकल न करता व कागदपत्रे नसताना व गोवंश हत्या बंदी कायदा महाराष्ट्रात लागु असताना त्यांची निर्दयीपणे कत्तल करण्यासाठी त्या गोवंशाला तेथे आणुन ठेवले होते. व फिर्यादी व फिर्यादीच्या सहका-यांना शिवीगाळ करुन त्यांना दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादी व त्यांचे सहका-यांवर गोवंश घेऊन जात असताना दगडफेक करुन फिर्यादी व त्यांचे सहका-यांना मारण्याचा प्रयत्न केला आहे.
अशा प्रकारे गोवंश तस्करी प्रकरणात शिवसेना नेत्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे सगळीकडे या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली होती
शिवसेना नेत्या विरोधातच....हा गुन्हा दाखल!
Reviewed by Prashasak
on
मार्च ०९, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: