हा जीवघेणा आवाज पोलिसांच्या कानावर पडणार कधी?सर्व नियम पायदळी तुडवून सुद्धा पोलीसांची फक्त बघ्याची भूमिका!
विशाल अ चव्हाण
प्रशासक न्यूज,दि.१४मार्च २०२५
डीजे च्या आवाजाबाबत न्यायालयाने काही मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत ध्वनी प्रदूषण रोखण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपवण्यात आलेली आहे डीजेचा आवाज किती डेसिबल असावा रात्री किती वाजेपर्यत डीजे वाजवता येतो याबाबत कायद्यात तरतूद आहे परंतु सध्या श्रीगोंदा शहर आणि तालुक्यात सगळीकडेच ध्वनी प्रदूषण कायदा पायदळी तुडवत कर्णकर्कश्य आवाजात डीजे बिनधास्त पणे वाजत आहेत ना त्यांना पोलिसांचा धाक आहे ना कायद्याची परवा आहे
याचे कारण म्हणजे एवढ्या मोठ्या आवाजात पोलीसांसमोरच डीजे वाजत असूनसुद्धा पोलीस घेत असलेली बघ्याची भूमिका.
श्रीगोंदा शहरात कोणतीही जयंती,कसली मिरवणूक किंवा कोणताही धार्मिक कार्यक्रम,सणउत्सव किंवा कुणाचा वाढदिवस,लग्न असले की नियम पायाखाली तुडवत पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून हे डीजे जोर जोरात वाजवले जातात डीजेच्या या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे डीजे च्या आवाजाला कंटाळून काही लोकांनी गावातून स्थलांतर करून दुसरीकडे जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करून लोकांचे कान फाडणाऱ्या या डीजे चालकांवर पोलीस नेमकी कारवाई करणार कधी असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे डीजे चालकांना सोबतच आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या आयोजकनावर देखील कारवाई होणे जरुरी आहे
*आनंद साजरा करण्याच्या नावाखाली फक्त धांगडधिंगा*
कुठलाही कार्यक्रम किंवा सण उत्सव हा आनंद साजरा करण्यासाठी साजरा केला जातो महापुरुषांची जयंती ही त्यांचे विचार सगळीकडे पोहोचवेत यासाठी साजरी करायची असते परंतु अलीकडे आनंद साजरी करण्याच्या व्याख्याच बदलली आहे डीजे चे फॅड सगळीकडे घुसले आहे डीजे चा कानठाळ्या बसवणारा आवाज सोडून फक्त धांगडधिगा करून लोकांना त्रास द्यायचा हा प्रकार अलीकडे दिसून येतोय आपण आनंद साजरा करताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेत डीजेच्या आवाज मर्यादेचे पालन करायला हवे आवाजाची मर्यादा पाळत वाद्य वाजवल्यास कुणाचीच हरकत राहणार नाही
*काय आहे डिजेबाबत नियमावली*
सर्वोच्च न्यायालयाने डीजे आणि मोठ्या आवाजाच्या उपकरणे यांवर काही निर्बंध घातले आहेत कार्यक्रमामध्ये मध्यम आकाराचे डीजे किंवा जास्तीत जास्त दोन लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी आहे ते सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच
ध्वनीप्रदूषण कायदा २०००नुसार आवाजाची तीव्रता चार विभागांत गणली जाते. औद्योगिक वसाहतीमध्ये दिवसा ७५ डेसीबल, तर रात्री ७० डेसीबल, कर्मशिअल झोनमध्ये दिवसा ६५ व रात्री ५५ डेसीबल, रहिवासी क्षेत्रात ५५ व रात्री ४५ डेसीबल, सायलेन्स झोनमध्ये दिवसा ५० व रात्री ४० डेसीबलचे निकष आहेत.
तसेच रुग्णालये,शैक्षणिक संस्था,धार्मिक स्थळ,न्यायलयांचे १००मिटर क्षेत्र शांत क्षेत्र(सायलेंस झोन)घोषित केल्याने त्या भागात ध्वनीक्षेपके लावता येत नाहीत रात्री दहा वाजल्यानंतर ध्वनीक्षेपके लावण्यास बंदी आहे तसेच कुठल्याही कार्यक्रमामध्ये ध्वनीक्षेपके लावण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे
*नियम मोडल्यास काय कारवाई होऊ शकते*
ध्वनी प्रदूषण नियमन आणि नियंत्रण कायद्यानुसार कायद्याचे उल्लंघन केल्यास पाच वर्षा पर्यत कारावासाची शिक्षा किंवा एक लाख रुपये दंड किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात
ध्वनी प्रदूषण नियमन आणि नियंत्रण कायद्यानुसार कायद्याचे उल्लंघन केल्यास पाच वर्षा पर्यत कारावासाची शिक्षा किंवा एक लाख रुपये दंड किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात
*कुठे करता येते तक्रार*
न्यायालयाने डीजे बँड वाजवण्याचा संदर्भात आवाजाची मर्यादा डेसिबल मध्ये ठरवून दिलेली आहे त्या मर्यादेचे पालन करून डीजे बँड वाजवता येतात अश्या प्रकारे नियम मोडून जर कुणी मोठ्या आवाजात बँड,डीजे वाजवत असतील तर त्याबाबत नागरिकांना ११२ या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार करता येते त्याबाबत तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते त्यामुळे अश्या प्रकारे मोठ्या आवाजाचा त्रास झाल्यास नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करावी
*डीजे च्या आवाजाचे दुष्परीणाम*
साधारनपणे ७०डेसिबल मर्यादे पर्यत चा आवाज आपले कान सहन करू शकतात १००डेसिबल च्या वरील आवाज सतत कानावर पडल्यास कानाचा पडदा फाटू शकतो कायमचा बहिरेपणा येऊ शकतो या आवाजामुळे कानाची जी नस आपल्या हृदयाला जोडलेली असते ती स्टीम्यूलेट होते त्यामुळे हृदयाचे ठोके बंद पडून माणसाला हार्ट अटॅक येऊ शकतो या मोठ्या आवाजामुळे माणसाचे मानसिक शारीरिक स्वास्थ्य बिघडते मानसिक संतुलन बिघडते मोठ्या आवाजामुळे व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो गर्भवती स्त्रीच्या गर्भाला हानी पोहोचू शकते यासह लहान मुले वृद्ध नागरिक यांना देखील या मोठ्या आवाजामुळे आरोग्याचा त्रास होतो असे मत तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे
*पोलिसांनी बघ्याची भूमिका सोडून नियम मोडणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करणे गरजेचे*
श्रीगोंदा शहरात मागील काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणासाठी मोठ्या मोठ्या आवाजात डीजे वाजत आहेत लग्न सराई सुरु असल्यामुळे तिथे सुद्धा कानफाडून टाकणाऱ्या आवाजात डीजे बिनधास्त वाजत आहेत रात्री दहा वाजल्यानंतर उशिरा पर्यत डीजे बिनधास्त वाजवले जात आहेत तरी या सगळ्यांकडे पोलीस मात्र दुर्लक्ष करत आहेत अनेकदा पोलीस स्टेशन समोरच जोर जोरात डीजे वाजवला जातो त्याचा पोलिसांच्या कामकाजवर थेट परिणाम होतो तरी पोलीस काहीच कारवाई या डीजे वाल्यांवर करत नाहीत याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे
नागरिकांनी तक्रार करून सुद्धा पोलीस कुठलीच कारवाई या डीजे चालकावर करत नाहीत हे विशेष पोलिसांकडे डेसिबल मॉनिटरिंग मशीन्स आहेत पण त्याचा वापर कुठे आणि कधीच करताना पोलीस दिसत नाहीत डीजे वाल्यांकडून आवाजाच्या सर्व मर्यादा तोडून रेकॉर्ड ब्रेक डेसिबल आवाजात डीजे वाजवले जात आहेत त्यामुळे पोलिसांनी आता तरी सरसकट आणि पारदर्शक कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे पोलिसांच्या या बघ्याच्या भूमिकेबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे
हा जीवघेणा आवाज पोलिसांच्या कानावर पडणार कधी?सर्व नियम पायदळी तुडवून सुद्धा पोलीसांची फक्त बघ्याची भूमिका!
Reviewed by Prashasak
on
मार्च १४, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
मार्च १४, २०२५
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: