संभाजी ब्रिगेड संघटनेचा त्या पक्षाशी कुठलाच संबंध नाही,त्या घटनेचा सुद्धा निषेध!...जिल्हाध्यक्ष कापसे
प्रशासक न्यूज,दि.२२मार्च २०२५
1995 साली स्थापन झालेली संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना आणि 2016 साली स्थापन झालेला संभाजी ब्रिगेड पक्ष यांचा एकमेकांशी कसलाही संबंध नाही.असे स्पष्ट मत संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे
दि.19-3-25 रोजी श्रीगोंदा शहरात जिजाऊ रथ यात्रा दाखल झाली.रथ यात्रा नियोजनामद्धे आमचा कुठलाही सहभाग नव्हता आणि आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला या बाबत विचारात घेतले गेले नाही.राजमाता जिजाऊ आमच्या प्रेरणा असल्या कारणाने तसेच तमाम बहुजन समाजाच्या मनामध्ये जिजाऊ माँसाहेबांविषयी नितांत आदर आहे.याच भावनेतून आम्ही संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तसेच इतरही जिजाऊ प्रेमी बंधू भगिनी रथाचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होतो.जिजाऊ रथ यात्रेचे स्वागत हे जिजाऊंच्या लेकींकडून होणे अपेक्षित असतांना या कार्यक्रमादरम्यान जिजाऊंच्या लेकींनाच जिजाऊंचे दर्शन घेण्यास आडवल्याचा प्रकार झाल्याचे समजले.ज्या महिलांना अडवले गेले त्या सर्व वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आहेत.म्हणून ही बाब गंभीर असून महिलांच्या स्वातंत्र्याला गदा आणणारी आहे.या घटनेचा संभाजी ब्रिगेड संघटनेच्या वतीने आम्ही निषेध करतो तसेच समतेचा नारा देणाऱ्यांकडून महिलांना अशी वागणूक देण्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा घडू नये यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी अशी विनंती संभाजी ब्रिगेड संघटनेचे जिल्हाद्यक्ष अरविंद कापसे यांनी व्यक्त केली आहे.
संभाजी ब्रिगेड संघटनेचा त्या पक्षाशी कुठलाच संबंध नाही,त्या घटनेचा सुद्धा निषेध!...जिल्हाध्यक्ष कापसे
Reviewed by Prashasak
on
मार्च २२, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: