दोन दिवसांपूर्वी श्रीगोंद्यात आलेल्या जिजाऊ रथयात्रेत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी महिला पदाधिकाऱयांना दर्शन घेण्यापासून आडवत महिलांचा अपमान करत त्यांना अरेरावी केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गट महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मीराताई शिंदे यांनी केला आहे तसेच या प्रकरणी परकाळे यांनी दोन दिवसात माफी न मागितल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा ईशारा शिंदे यांनी दिल्यामुळे दोन पक्षांच्या जिल्हाध्यक्षान मधील हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत
मीराताई शिंदे यांनी आज श्रीगोंद्यात पत्रकार परिषद घेत या घटने बाबत माहिती देत संभाजी ब्रिगेडचे राजेश परकाळे यांनी तिथे उपस्थित असलेल्या महिलांना अपमानस्पद वागणूक दिल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली तसेच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांचा अपमान होऊन सुद्धा साधा निषेध देखील व्यक्त न केल्यामळे नाराजी व्यक्त केली
पत्रकार परिषदेत बोलताना श्रीमती शिंदे म्हणाल्या की,मी चळवळीत आणि विचारधारेत काम करते म्हणून फक्त जिजाऊंचे दर्शन घेण्यासाठी तिथे गेलो होतो रथयात्रा श्रीगोंद्यात आली असता जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि इतर महीलांसह आपण तिथे दर्शन घेत असताना संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी दर्शन घेऊन दिले नाही नंतर महंमद महाराज प्रांगणात दर्शन घेत असताना सुद्धा दर्शन घ्यायचे नाही रथात यायचे नाही असे म्हणत गुंडगिरी ची भाषा वापरली असा आरोप श्रीमती शिंदे यांनी करत परकाळे यांनी समस्त महिलांचा अपमान केला आसू याबाबत त्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा ईशारा शिंदे यांनी दिला आहे
त्यामुळे आता संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष परकाळे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
माफी मागा अन्यथा गुन्हा दाखल करणार,दोन जिल्हाध्यक्षांमधला वाद पेटण्याची शक्यता!
Reviewed by Prashasak
on
मार्च २२, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: