प्रशासक न्यूज,दि.२२मार्च२०२५
कुणी घर देत का घर नटसम्राट नाटकातील या डायलॉग प्रमाणे एक महिना आवर्तन सुरु असूनसुद्धा श्रीगोंदा तालुक्यातील अनेक शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून वंचित राहिले आहेत शेतकऱ्यांना पाणी मिळत नसताना आमदार खासदार आणि विरोधी नेते मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत आणि त्यामुळेच शेतकऱ्यांवर कुणी आम्हाला पाणी देत का पाणी असे म्हणायची वेळ आली आहे
कर्जत,करमाळा आणि पारनेर या तालुक्यापेक्षा श्रीगोंदा तालुक्यातील सर्वात जास्त क्षेत्र हे कुकडीच्या पाण्यावर ओलिताखाली आहे असे असूनसुद्धा आणि दरवेळी एक महिन्या पेक्षा जास्त काळ हे आवर्तन खालच्या भागात सुरु राहते आणि नेमके श्रीगोंदा तालुक्यात आवर्तन सुरु झाले की पाच ते सहा दिवसात ते बंद होते श्रीगोंदा तालुक्याच्या वाट्याला अवघे पाच ते सहा दिवस हे पाणी येत असल्यामुळे तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी या आवर्तनापासून वंचित राहत आहेत
चालू आवर्तनात पाणी न मिळाल्यामुळे दोन दिवसांपूर्वीच आढळगाव येथे चार तास शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले होते त्यावेळी कार्यकारी अभियंत्यांच्या लेखी आश्वासनानंतर सुद्धा शेतकऱ्यांना पाणी मिळालेलं नाही मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे त्यामुळे तालुक्यातील ओढे बंधारे नदीला पाणी सोडून ते भरणे गरजेचे होते पण आज सुद्धा अनेक भागात पाणी पोहोचलच नाही त्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे
श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे कुकडीच्या पाण्यावर अवलंबून आहे परंतु दरवेळी आवर्तनात श्रीगोंद्यावर होत असलेला अन्याय त्यामुळे तालुक्यात निर्माण होणारी पाणी टंचाई यामुळे शेती आणि पशुधन अडचणीत आले आहे असे असूनसुद्धा ज्या नेत्यांनी निवडणुकीत कुकडीचा पाणी प्रश्न हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा केला होता ते मात्र आता कुठे गायब झाले आहेत हे समजायला तयार नाही
*आमदार,खासदार गप्प,विरोधी नेत्यांची 'तेरी भी चूप मेरी भी चूप*
कुकडीच्या आवर्तनात श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना आमदार विक्रम पाचपुते याबाबत ठोस काहीतरी भूमिका घेतील अशी अपेक्षा असताना त्यांनी विधानसभेत शेतकऱ्यांना समजावणे गरजेचे आहे पाणी मिळत नाही यात सरकारचा दोष नाही पाणी चोरी मोठ्या प्रमाणात होते असे वक्तव्य केले पण शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही याबाबत ते काहीच बोलले नाही आमदारांच्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे
निवडणूक काळात बोलताना शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही तर वेळप्रसंगी कुकडी कालवा फोडण्याची भाषा करणारे खासदार निलेश लंके यांनी देखील श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे तर विधानसभेला अपक्ष उमेदवारी करुनसुद्धा तालुक्यातील जनतेने ज्यांना दुसऱ्या क्रमांकांची मते दिली ते माजी आमदार राहुल जगताप हे तर निवडणूक झाल्यापासून दिसेनासे झाले आहेत त्यांच्याशी अनेकदा संपर्कसुद्धा होत नसल्याची लोकांची तक्रार आहे तर महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यासुधा विधानसभा निवडणुकीनंतर अलिप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे तर त्यांचे पती राजेंद्र नागवडे हे कारखान्यातच व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे निवडनुकीत कुकडीच्या पाण्यावर रान पेटवू असे बोलणारे नेते आज मात्र शेतकरी अडचणीत असताना त्यावर चकार शब्द बोलायला तयार नाहीत त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे

कुणी आम्हाला पाणी देत का पाणी,ना खासदार,आमदारांची साथ ना विरोधी नेत्यांचा प्रतिसाद!
Reviewed by Prashasak
on
मार्च २२, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: