तो आला आणि बिनधास...,श्रीगोंद्यातील या घटनेमुळे एकच खळबळ!

प्रशासक न्यूज,दि.२४मार्च २०२५

श्रीगोंदा शहरातील रविवार पेठ,तेली गल्ली येथील हनुमान ट्रेडर्स या दुकानात काल सायंकाळी ७वाजण्याच्या सुमारास धाडसी चोरी झाली यात दुकानाच्या गल्ल्यातून चोरट्याने ७०हजार रुपये बिनधासपणे चोरून नेले या चोरीचे सिसिटीव्ही फुटेज आता समोर आले आहे
सदर चोरीबाबत अतुल मेहता यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल मेहता यांनी सायंकाळी दिवसभर झालेल्या व्यवसायाची रक्कम जुळवून गल्ल्यात ठेवून ते दुकानाच्या मागच्या बाजूला गेले त्याचवेळी एक तरुण त्या ठिकाणी आला दुकानात कुणी नाही याचा अंदाज घेऊन त्याने गल्ल्यातील रक्कम चोरून नेली भर बाजारपेठेत झालेल्या धाडसी चोरीमुळे एकच खळबळ उडाली आहे पोलीस पुढील तपास करत आहेत
तो आला आणि बिनधास...,श्रीगोंद्यातील या घटनेमुळे एकच खळबळ! तो आला आणि बिनधास...,श्रीगोंद्यातील या घटनेमुळे एकच खळबळ! Reviewed by Prashasak on मार्च २४, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.