प्रशासक न्यूज,दि.२५मार्च २०२५
श्रीगोंद्यातील नागरिक डीजेच्या आवाजाने हैराण झालेले असतानाच आता बुलेट गाडीच्या सायलेंसर मधून जोर जोरात फटाकड्याचा आवाज काढण्यामुळे श्रीगोंदेकर हैराण झाले आहेत या प्रकारामुळे शहराची शांतता भंग पावत आहे गावातील तसेच बाहेर गावातील काही तरुणांनी तसेच काही समजदार व्यक्तींनी सुद्धा जाणीवपूर्वक आपल्या बुलेट ला फटाकड्याचा आवाज निघणारे सायलेंसर बसवले आहेत
सकाळी किंवा दुपार च्या वेळेस हे टवाळखोर तरुण महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याने किंवा शहरातील बाजारपेठेत विविध चौकात तसेच पायी चालणाऱ्या तरुणींच्या बाजूने जाऊने मुद्दाम आपली बुलेट जोरात चालवून त्यातून फटाकड्या चा जोर जोरात आवाज काढतात भरचौकात गल्लीत अश्या प्रकारे सर्रास या बुलेट स्वारांनी त्यांच्या दुचाकीच्या सायलेंसर मधून असा फटाकड्याचा आवाज काढत हैदोस घातला आहे तरी त्यांच्यावर समाधान कारक कारवाई होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे
दोन दिवसापूर्वीच शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक(पेडगाव चौक)येथे अश्याच प्रकारे भर दुपारी बुलेट च्या सायलेंसर मधून पेडगाव येथील रोहन भाऊसाहेब गोधडे हा तरुण त्याची बुलेट गाडी क्रं एम एच १४ एच झेड ४५१३ याची जोरात रेस करून त्याच्या बुलेटच्या सायलेंसर मधून फटाकडे वाजवल्याचा आवाज काढत होता त्यावेळी तेथील मोबाईल व्यावसायिक करण लांडगे याने गोधडे या तरुणास आसपास लोकांचे लहान बाळ आहे तू गाडीतून जोरात आवाज काढू नकोस असे त्याला सांगितले त्यानंतर रोहन गोधडे याने तूला गाठून मारणार अशी धमकी दिली होती सायलेंसर मधून आवाज काढण्यास विरोध केल्याचा राग मनात धरून काल दि २४ रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास करण लांडगे हा पेडगाव कडे जात असताना रोहन गोधडे,भरत गोधडे आणि ऋषिकेश गोधडे यांच्यासह अनोळखी चार इसमांनी करण लांडगे याला काठ्या गज आणि लाथा बुक्क्यानी मारहाण केली तसेच लांडगे याच्या खिशातील २०,०००रुपये रोख रक्कम काढून घेतली सदर घटनेबाबत करण लांडगे याने दिलेल्या फिर्यादीवरून वरील सर्व व्यक्तीनविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
*पोलिसांनी कडक कारवाई करणे गरजेचे*
श्रीगोंद्यात अश्या प्रकारे बुलेट गाडीच्या सायलेंसरमधून फटाकडे फोडण्याचा आवाज काढण्याच्या प्रकारामुळे सर्वच नागरिक वैतागून गेले आहेत पोलिसांनी या आधी अश्या प्रकारे आवाज काढणाऱ्या काही तरुणांवर कारवाई केली आहे परंतु आता या कारवाईत सातत्य आणून अश्या दुचाकी स्वारांसह अश्या प्रकारे सायलेंसर ची विक्री करणाऱ्या दुकानदारांचा शोध घेऊन त्यांच्यावर सुद्धा कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे आहे
*नागरिकांनी पोलिसांना कळवावे*
फक्त पोलीस कारवाई करत नाहीत असे म्हणून लोकांनी आपली जबाबदारी झटकून चालणार नाही नागरिकांनी सुद्धा आपली जबाबदारी पार पाडणे जरुरी आहे अश्या प्रकारे जर कुणी आपल्या दुचाकीच्या सायलेंसर मधून जोरात आवाज काढत असेल तर नागरिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क करायला हवा तसेच त्या दुचाकीचा नंबर लिहून घेऊन त्याबाबत पोलिसांना माहिती द्यायला हवी तरच अश्या दुचाकिंवर पोलिसांना कारवाई करणे सोपे जाईल
*पालकांनी जबाबदारीचे भान ठेवावे*
अनेक पालक आपल्या अल्पवयीन पाल्याला दुचाकी चालवण्यास देतात त्यामुळे ते तरुण बिंनधास वाहतूकीचे नियम मोडत आहेत अश्या प्रकारे आपल्या पाल्याणकडून वाहतूकीचे नियम पायदळी तुडवले जाणार नाहीत यासाठी पालकांनी आपल्या मुलांना कडक भाषेत समज देणे गरजेचे आहे मुलांना वाहने देणे टाळायला हवे अश्या प्रकारे सायलेंसर बसवण्यास पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना मज्जाव करणे गरजेचे आहे
श्रीगोंदेकर आता 'या' आवाजाने हैराण,विरोध केल्यामुळे तरुणाला मारहाण!
Reviewed by Prashasak
on
मार्च २५, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: