'ही' घटना लोकशाहीसाठी घातक,सखोल तपास होऊन दोषींवर कारवाईची मागणी!


प्रशासक न्यूज,दि.१८जानेवारी२०२५

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची नुकतीच मढेवडगावचे सरपंच प्रमोद शिंदे,उपसरपंच राहुल साळवे,ग्रामपंचायत सदस्य योगेश तात्या शिंदे अभिजित शिंदे,बाळासाहेब फापाळे यांनी सांत्वनपर भेट घेऊन सदर घटनेचा निषेध केला आणि देशमुख कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

राजकीय वैमनस्यातून कार्यकर्त्यांच्या हत्या होत राहिल्या, तर हे लोकशाहीसाठी घातक ठरणार आहे.राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले,तर चांगले आणि प्रामाणिक लोक राजकारणात येण्यास धजावणार नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून आरोपींना अटक करण्याचे आदेश द्यावेत आणि या घटनेचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.




'ही' घटना लोकशाहीसाठी घातक,सखोल तपास होऊन दोषींवर कारवाईची मागणी! 'ही' घटना लोकशाहीसाठी घातक,सखोल तपास होऊन दोषींवर कारवाईची मागणी! Reviewed by Prashasak on जानेवारी १७, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.