अखेर त्या प्रकरणात गुन्हा दाखल,पण शासकीय यंत्रणेतील दोषींवर कारवाई कधी?


प्रशासक न्यूज,दि.१६जानेवारी२०२५

श्रीगोंदा शहरातील घोडेगाव रस्त्यावरील दि कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ क्राईस्ट इन वेस्टर्न इंडिया या संस्थेची नगरपरिषद सर्व्हे नं १७४९मधील १०हेक्टर९२गुंठे शेतजमीन बनावट कागदपत्रे तयार करून शासकीय यंत्रणेच्या मदतीने परस्पर विक्री केल्याच्या प्रकरणात काल रात्री उशिरा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सुजित भैरू जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या फसवणूक प्रकरणी १)दीपक नामदेव गायकवाड रा.कोंडोली जि.कोल्हापूर२)सतीश डॅनीयल भालेराव रा.श्रीगोंदा३)वैभव वसंतराव पारधे रा.बारामती जि. पुणे४)संदीपान किसन तुपारे रा.अहिल्यानगर या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सुजित जाधव यांनी दिलेल्या फिर्यादित म्हंटले आहे की दि कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ क्राईस्ट इन वेस्टर्न इंडिया या संस्थेची श्रीगोंदा शहरातील घोडेगाव रस्त्यावर शेतजमीन आहे त्यात संस्थेचे हायस्कुल,चर्च,धार्मिक स्थळे,प्राथमिक शाळा,बालगृह, निवासस्थान आहे या जमिनीची वरील चार जणांनी बनावट कागदपत्रे तयार करून,संगनमताने कट करून शासकीय यंत्रणेच्या मदतीने ही जमीन दीपक गायकवाड यांनी स्वतःच्या नावावर करत तिची नंतर बेकायदेशीर विक्री केली आहे त्यामुळे या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

*शासकीय यंत्रणेतील दोषींवर कारवाई कधी*
सदर जमिन विक्री प्रकरणात संस्थेला कोणतीही नोटीस देण्यात आली नाही,संस्थेच्या कार्यालयास किंवा अध्यक्ष यांना याबाबत कोणतेही लेखी कळवले नाही,परस्पर श्रीगोंदा तहसीलदार यांना अहवाल सादर करून तहसीलदार यांनी त्याबाबत कोणत्याही प्रकारे केस(सुनावणी)न चालवता बेकायदेशीर रित्या एकतर्फी निकाल देत दीपक गायकवाड यांच्या नावे सातबाराची नोंद केली आहे त्यामुळे या जमीन विक्री प्रकरणात श्रीगोंदा तहसीलदार तसेच मंडळाधिकारी, यांनी नियमांची पायमल्ली केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे
अखेर त्या प्रकरणात गुन्हा दाखल,पण शासकीय यंत्रणेतील दोषींवर कारवाई कधी? अखेर त्या प्रकरणात गुन्हा दाखल,पण शासकीय यंत्रणेतील दोषींवर कारवाई कधी? Reviewed by Prashasak on जानेवारी १६, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.