..आणि श्रीगोंदा पोलिसांनी रात्र पिंजून काढत त्या घटनेचा लावला छडा!


प्रशासक न्यूज,दि.१८जानेवारी२०२५
विशाल अ चव्हाण 
पोलीस सुतावरून स्वर्ग गाठतात हे आपण ऐकतो परंतु गोळीबाराची एक घटना घडली असल्याबाबत मिळालेली एक निनावी माहिती ना गावाची माहिती ना कुठल्या ठिकाणी ही घटना घडली त्याची माहिती तरीसुद्धा एका माहितीच्या आधारे श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे,पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर,पोलीस कर्मचारी संदीप शिरसाठ,संदीप राऊत,अरुण पवार, गोकुळ इंगवले या पथकाने कालची संपूर्ण रात्र डोक्यावर घेत अखेर श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी या गावात हॉटेल शिवराज या ठिकाणी झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा छडा लावलाच

या गोळीबाराच्या घटनेबाबत सुभाष पाचपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैभव सुभाष चौधरी आणि साई मदने दोघे रा काष्टी यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आज विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत या गोळीबाराच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे

काल रात्री बारा वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना एका अज्ञात व्यक्तीने श्रीगोंदा तालुक्यात गोळीबार झाल्याची माहिती दिली परंतु ही गोळीबाराची घटना कुठे घडली याबाबत माहिती दिली नाही त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला संपर्क साधला असता संपर्क झाला नाही परंतु पोलीस निरीक्षक शिंदे यांनी घटनेचे गंभीर्य ओळखून आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना बोलावून घेत दोन पथके या घटनेचा शोध घेण्यासाठी तयार केली रात्र पिंजून काढून सुद्धा घटना कुठे घडली नेमकी अशी घटना घडली की नाही हे पोलिसांना समजेना त्यानंतर एका अस्पष्ट फोटोच्या आधारे या ठिकाणाचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली तसेच काही गुप्त बातमीदार कामाला लावले पोलिसांनी घेतलेल्या मेहनती नंतर श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावातील हॉटेल शिवराज याठिकाणी काल रात्री अगदी किरकोळ कारणातून गोळीबार झाल्याची खात्रीशीर माहिती समजली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता हा गोळीबार झाल्याचे निषपन्न झाले या गोळीबारात कुणीही जखमी झालेले नसले तरी अश्या प्रकारे गोळीबाराच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे पोलिसांनी घटनेचा छडा लावल्यानंतर फिर्यादी सुभाष पाचपुते यांनी घटना झाल्याचे सांगत पोलीस ठाण्यात घटनेबाबत फिर्याद दिली

*पोलीस स्टेशनच्या आवारात फिर्यादीला दमबाजी आणि पोलीस निरीक्षकांचा सिंघम अवतार*
या घटनेबाबत फिर्याद देण्यासाठी आलेल्या पाचपुते यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वैभव चौधरी याने पोलिसां समोरच दम देण्यास सुरुवात केली त्यानंतर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी आपली सिंघम स्टाइल दाखवत चौधरी याला पोलिसी खाक्या दाखवला शिंदे यांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे

*पोलीस निरीक्षकांचे आवाहन*
वैभव चौधरी याच्यावर श्रीगोंदा व दौंड पोलीस स्टेशनला विविध प्रकारचे १६गुन्हे दाखल असून दुसरा आरोपी मदने याच्यावर देखील ३गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले असून सदर आरोपी वैभव चौधरी किंवा साई मदने याच्या विरोधात कुणाची काहीही तक्रार असल्यास न घाबरता त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी केले आहे

घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,पोलीस उपाधीक्षक विवेकानंद वाखारे यांनी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या

 रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे श्रीगोंदा तालुक्यात गावठी कट्ट्याचे कनेक्शन उघड झाले आहे हा कट्टा कुठून आणला अजून कुणाकडे असे गावठी कट्टे आहेत का याचाही तपास आता पोलीस करणार आहेत 

..आणि श्रीगोंदा पोलिसांनी रात्र पिंजून काढत त्या घटनेचा लावला छडा! ..आणि श्रीगोंदा पोलिसांनी रात्र पिंजून काढत त्या घटनेचा लावला छडा! Reviewed by Prashasak on जानेवारी १८, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.