...आणि म्हणून उद्या श्रीगोंदा शहर बंद ची हाक!


प्रशासक न्यूज,दि.१७डिसेंबर२०२४

परभणी येथे संविधान प्रतिकृतीच्या झालेल्या मोडतोडीच्या निषेधार्थ आणि भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू या दोन्ही घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी श्रीगोंदा शहरातील आंबेडकरवादी अनुयायांनी उद्या दि.१८ बुधवार रोजी श्रीगोंदा शहर बंदची हाक दिली आहे या बंदबाबत आज श्रीगोंदा तहसीलदार व श्रीगोंदा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे

परभणी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रतिकृतीची एका माथेफिरूने विटंबना केली होती त्यानंतर पोलिसांनी निरपराध लोकांना अमानुष मारहाण करून अनेक कार्यकर्त्यांना अटक केली पोलीस कोठडीत भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी या निरपराध तरुणाचा मृत्यू झाला त्याला कारणीभूत असणाऱ्या पोलिसांवर ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच दोषी पोलीस अधिकारी कर्मचारी यांना निलंबीत करण्यात यावे तसेच निरपराध लोकांना अमानुष मारहाण करून अटक करण्यात आली त्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत तसेच संविधान आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टात आरोपीस कडक शासन करावे या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत

या सर्व घटनेच्या निषेधार्थ उद्या श्रीगोंदा शहर बंदची हाक देण्यात आली आहे

...आणि म्हणून उद्या श्रीगोंदा शहर बंद ची हाक! ...आणि म्हणून उद्या श्रीगोंदा शहर बंद ची हाक! Reviewed by Prashasak on डिसेंबर १७, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.