तरुणाचे उपोषण,अभियंत्याचे हतबल उत्तर..


प्रशासक न्यूज,दि.१७डिसेंबर२०२४

राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी चे आढळगाव ते जामखेड पर्यत अपूर्ण काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी निलेश लंके प्रतिष्ठानचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष सुभान तांबोळी यांनी काल सोमवार पासून आढळगाव बसस्थानकावर आमरण उपोषण सुरु केले आहे

राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी आढळगावं ते जामखेड हा रस्ता आढळगावं गावठाण व पुढील गावांमध्ये ठीक ठिकाणी अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपूर्ण कामा मुळे मागील तीन ते चार महिन्यांमध्ये २० ते २५ लोकांचे बळी जाऊन कित्येक लोकांना अपंगत्व आले आहे.

गेल्या सात ते आठ महिन्यांमध्ये रस्ता खोदून ठेवल्या मुळे आढळगावं परिसरात धुळीचे प्रमाण वाढले आहे.व अपूर्ण गटार लाईन मुळे पाणी साचून परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन साथीच्या रोगाचे व धुळी मुळे स्वशनाच्या रोगाचे प्रमाण वाढत आहे याचा सगळ्यात जास्त त्रास हा रस्त्यालगत असलेल्या जिल्हा परिषद शाळा व उच्च माध्यमिक शाळा मधील मुलांना व परिसरातील नागरिकांना होत आहे.ही बाब अतिशय गंभीर होत चाली आहे. त्यामुळे या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी निलेश लंके प्रतिष्ठान श्रीगोंदा तालुकाध्यक्ष सुभान तांबोळी यांनी उपोषण सुरु केले असून उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे

*अभियंत्याचे हतबल उत्तर,उपोषण सुरूच*
अहिल्यानगर येथील राष्ट्रीय महामार्ग उपअभीयंता अभिमन्यू जमाले, उपअभियंता,
रावसाहेब धांडोरे, शाखा अभियंता
रीहाना इनामदार ज्युनियर इंजिनिअर यांनी काल आढळगाव येथे जाऊन उपोषणकर्ते सुभान तांबोळी यांची भेट घेऊन पुणे येथील निखिल कॅन्स्ट्रक्षण यांना हे काम देण्यात आले असून ते ठेकेदार आमचं ऐकत नाहीत आम्हालाच उडवाउडवी ची उत्तरे दिली जातात असं हतबल उत्तर दिले त्यामुळे सुभान तांबोळी यांनी आपले उपोषण आज दुसऱ्या दिवशी सुरु ठेवले आहे



तरुणाचे उपोषण,अभियंत्याचे हतबल उत्तर.. तरुणाचे उपोषण,अभियंत्याचे हतबल उत्तर.. Reviewed by Prashasak on डिसेंबर १७, २०२४ Rating: 5

Post Comments

Blogger द्वारे प्रायोजित.