श्रीगोंद्यात 'यांच्या' फोटोला जोडे मारत कार्यकर्त्यांनी व्यक्त केला संताप!


प्रशासक न्यूज,दि.१७डिसेंबर२०२४

माजी मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना जाणीवपूर्वक अजित पवार यांनी मंत्रिमंडळात स्थान न देता डावलले असून भुजबळ यांना डावलून त्यांनी ६०% ओबीसींचा अपमान केला आहे ओबीसींचा आवाज दाबण्याच काम महायुती सरकार करत असल्याचा आरोप गोरख आळेकर यांनी केला
आज श्रीगोंद्यात सकल ओबीसी समाज्याच्या वतीने उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडो मारो आंदोलन करण्यात आले यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली

या आंदोलनावेळी गोरख आळेकर,भाऊसाहेब खेतमाळीस, राजू गाडेकर,शिवाजी राऊत, दिलीप आळेकर, महेश गांजुरे,संजय डाके,शंकर भुजबळ,महेश राऊत, दिलीप आनंदकर,विजय शेंडगे,ओंकार शिंदे,वामन भदे,कांतीलाल कोकाटे,शंकर बोरुडे,वसंत बनसोडे, हजारें साहेब,संकेत खामकर,किशोर बोळगे इत्यादी उपस्थित होते.


श्रीगोंद्यात 'यांच्या' फोटोला जोडे मारत कार्यकर्त्यांनी व्यक्त केला संताप! श्रीगोंद्यात 'यांच्या' फोटोला जोडे मारत कार्यकर्त्यांनी व्यक्त केला संताप! Reviewed by Prashasak on डिसेंबर १७, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.