"निलंबन"झालं म्हणजे माझी माघार झाली नाही.. निवडून आल्यावर आधी बारामतीलाच जाणार!सांगता सभेतून राहुल जगताप यांचा हल्लाबोल


प्रशासक न्यूज,दि.१८ नोव्हेंबर२०२४
विशाल अ चव्हाण

कालपासून विरोधकांनी माझ्या निलंबनाच पत्र त्यांच्या स्टेटसला ठेवलं आहे स्टेटसला माझं पत्र ठेवून माझा फुकट प्रचार केल्याबद्दल मी विरोधकांना धन्यवाद देतो असे म्हणत विरोधकांना टोमणा मारतानाच माझं निलंबन प्रदेशाध्यक्षांनी किंवा जिल्हाध्यक्षांनी केलेले नाही त्यामुळे या निलंबनाला मी फारस महत्व देत नाही असे सांगत अपक्ष म्हणून निवडून आल्यावर मी आधी बारामतीला शरद पवार यांच्याकडेच जाणार असे ठामपणे माजी आमदार राहुल जगताप यांनी आज घेतलेल्या प्रचाराच्या सांगता सभेत सांगितले श्रीगोंदा शहराती संत शेख महंमद महाराज मंदिर प्रांगणात अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांच्या प्रचाराच्या सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जगताप बोलत होते

स्त्री हट्ट आणि बालहट्ट पुरवण्यासाठी समोरच्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे परंतु मी मात्र जनतेचा हट्ट आहे म्हणून ही निवडणूक लढवत आहे असे सांगत आपल्या आईची शपथ घेत निवडून आल्यावर कसलीच टक्केवारी न घेता प्रामाणिकपणे विकासकामे करणार असल्याचे जगताप यांनी या सभेत सांगितले तसेच जगताप यांनी आज थेट नाव घेत जेष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्यावर टिकेची तोफ डागत ते ज्यांच्यासोबत असतात त्यांचा पराभव होतो अशी मिश्किल टिप्पणी करत मी लोकसभेला १३८कोटी रुपयांचे कर्ज नाकारले आणि एकनिष्ठ राहिलो त्यामुळे माझ्यावर २०कोटी रुपयांना विकलो गेल्याचा व भाजप ची बी टीम असल्याचा आरोप खोटा असल्याचे स्पष्टीकरण जगताप यांनी दिले

यावेळी बोलताना राहुल जगताप यांच्या मातोश्री श्रीमती जगताप यांनी आक्रमक होत बाबासाहेब भोस आणि घनश्याम शेलार यांच्यावर टीका केली

टिळक भोस यांनी आपल्या भाषणातून आमदार बबनराव पाचपुते व भाजप उमेदवार विक्रमसिंह पाचपुते यांच्यावर चांगलीच तोफ डागली तर जलजीवन योजना ही आमदार खासदार यांच्यासाठी कमिशन योजना होती असे सांगत भ्रष्टाचारचा प्रताप आणि टक्केवारीचा विक्रम तालुक्याच्या पदरात पडल्याची टीका त्यांनी पाचपुते यांच्यावर केली

यावेळी कुकडी कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक मरकड यांनी आपली फसवणूक झाली मला श्रीगोंदा कारखान्याचे एम डी करतो असे सांगितल्यामुळे मी कुकडी कारखान्यातून बाहेर पडलो त्यामुळे कुकडी कारखाना अडचणीत आल्याचे सांगुन ती आपली चूक होती असे कबूल केले

आजच्या या प्रचाराच्या सांगता सभेत शरद कुदांडे, अजीम जकाते,ज्योती खेडकर,स्मितल भैय्या वाबळे,सौ मीना सकट,उत्तम डाके,अनिल ठवाळ, राजेश परकाळे,रंगनाथ निमसे,राजेंद्र म्हस्के,मनोहर पोटे, केशव भाऊ मगर यांची भाषणे झाली

सूत्रसंचालन दीपक पाटील भोसले यांनी केले तर हरिदास शिर्के यांनी प्रस्ताविक केले कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
"निलंबन"झालं म्हणजे माझी माघार झाली नाही.. निवडून आल्यावर आधी बारामतीलाच जाणार!सांगता सभेतून राहुल जगताप यांचा हल्लाबोल "निलंबन"झालं म्हणजे माझी माघार झाली नाही.. निवडून आल्यावर आधी बारामतीलाच जाणार!सांगता सभेतून राहुल जगताप यांचा हल्लाबोल Reviewed by Prashasak on नोव्हेंबर १८, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.