आतापर्यत "आमदार" म्हणून काम केल आता आमदाराचा "बाप" म्हणून काम करणार,मुलासाठी आई आणि वडिलांची भावनिक साद!विक्रम पाचपुते यांचं विरोधकांना सयंमी उत्तर!


प्रशासक न्यूज,दि.१८ नोव्हेंबर२०२४
विशाल अ चव्हाण

येत्या २०तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील आ बबनराव पाचपुते यांच्या मुळगावी काष्टी येथे भाजपचे उमेदवार विक्रमसिंह पाचपुते यांच्या प्रचाराच्या सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत विक्रमसिंह पाचपुते हे विरोधकांकडून त्यांच्यावर सातत्याने होणाऱ्या विविध आरोपांना आक्रमक शैलीत उत्तर देतील असे वाटतं असतानाच त्यांनी मात्र आज संयमाने वागून कामातून विरोधकांना उत्तर द्यायचे विरोधकांवर टीका करण्यापेक्षा आपण जे केल ते लोकांना सांगायचं ही आपल्या वडिलांची शिकवण आणि संस्कार असल्याचे सांगत आपल्या संयमी भाषणाने त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी बोलताना आमदार बबनराव पाचपुते यांनी आपण आता फक्त २३तारखेपर्यत आमदार असून आमदार म्हणून आज हे माझं शेवटचं भाषण असल्याचे सांगत उपस्थित जनसमुदायाला भावनिक साद घातली तसेच आतापर्यत मी आमदार म्हणून काम केल पण आता इथून पुढच्या काळात आमदाराचा बाप म्हणून काम करणार असा ठाम विश्वास पाचपुते यांनी यावेळी व्यक्त केला तसेच अनेक जण माझ्या वाईटावर टपले असून काहींनी तर मला सरणावर पोहोचवण्याची तयारी केली होती असे सांगत दादा आहेत राहणार आणि जोरात काम करणार असे विरोधकांना ठणकावून सांगत त्यांच्या प्रकृती अस्वसथ्यावरून टीका करणाऱ्यांचा आ बबनराव पाचपुते यांनी शालजोडीतून चांगलाच समाचार घेतला तसेच प्रेमाने माणसं जवळ करा सत्तेचा वापर सामान्य जनतेसाठी करा,कुणाच्या अडचनीत आणि दुःखात राजकारण करायच नाही ही आपल्या आई वडिलांची शिकवण आहे आणि तीच आपण मुलांना आपण दिल्याचे पाचपुते यांनी सांगितले तसेच जाती धर्माच राजकारण मी कधी केल नाही फक्त जनतेच्या हितासाठी अहोरात्र झटलो २१वेळा जेल मध्ये गेलो सत्ता ही उगीच मिळत नाही त्यासाठी खूप मोठा त्याग करावा लागतो असे देखील आमदार पाचपुते यांनी सांगतानाच श्रीगोंदा तालुक्यात एमआयडीसी करणार आणि साकळाई देखील करणारच असे सांगतानाच श्रीगोंदा तालुक्याला महाराष्ट्रातला आग्रेसर तालुका करणार असल्याचे देखील आमदार बबनराव पाचपुते यांनी या सांगता सभेत बोलताना सांगितले

या सांगता सभेत आपले मनोगत व्यक्त करताना भाजप उमेदवार विक्रमसिंह पाचपुते यांनी गावोगावी एवढी विकासकामे करून सुद्धा विरोधकांना विकास दिसत नाही हे दुर्दैवी असल्याचे सांगत टीका करणं सोपं आहे पण प्रत्यक्षात काम करणं अवघड आहे असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला तसेच मी कधी तरी श्रीगोंद्यात दिसतो अशी टीका माझ्यावर होते पण स्टार पचारक कधीतरीच दिसत असतो माझ्यावर आतापर्यत कोणतीच जबाबदारी नव्हती पण आता जनतेने जबाबदारी दिल्यावर मी गाव तालुका सोडणार नाही तसेच आपल्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती देताना माझ्यावर जे गुन्हे दाखल झाले ते एका कारखान्याचा अध्यक्ष म्हणून गुन्हे दाखल झालेत व्यक्तिगत विक्रम पाचपुते चुकीचा वागला म्हणून ते गुन्हे दाखल झालेले नाहीत असे त्यांनी सांगत कारखाना अडचणीत होता तो अडचणीतून बाहेर सुद्धा मीच काढला असे विक्रम पाचपुते यांनी यावेळी सांगितले

*पाचपुते नावाची खरी ताकद आणि पाचपुते हेच मोठे नेते*
बबनराव पाचपुते हे नाव हीच माझी खरी ताकद असून मला भाजप नेत्यांनी सभा दिली नाही असा आरोप विरोधक करत आहेत परंतु मला सभा मिळत असताना सुद्धा मी ती नाकारली कारण बबनराव पाचपुते हेच नेते तालुक्यातील सर्वात मोठे नेते आहेत असे विक्रमसिंह यांनी यावेळी सांगितले

तसेच विरोधी उमेदवारांना तालुक्यातील प्रश्नांची जाणीव नसल्याची टीका करतानाच माळढोक आरक्षण असल्यामुळे एमआयडीसी उभारण्यात अडचणी येत होत्या परंतु माळढोक आरक्षण हटल्यानंतर आता एमआयडीसीचा मार्ग मोकळा झाला असून जमिनीचा उतारा एमआयडीसीच्या नावाने वर्ग झाल्याचे सांगत एमआयडीसी होणारच असे विक्रम पाचपुते यांनी ठामपणे सांगितले

आजच्या प्रचार सभेत बोलताना डॉ प्रतिभा पाचपुते यांनी आपल्याला बबनराव पाचपुते यांच्या तब्बेतीकडे लक्ष द्यायचे असल्यामुळे मी आणि बबन दादांनी उमेदवारी बदलून ती विक्रम यांना देण्याची विनंती पक्षाकडे केली आणि पक्षाने ती मान्य केली कारण बबनराव पाचपुते यांचे वरिष्ठ पातळीवर असलेले वजन भाजप मधील उमेदवारी बदलल्याची महाराष्ट्रातील ही पहिली घटना असल्याचे सौ पाचपुते यांनी सांगितले तसेच उमेदवारी बदलल्यावरून आमच्या घरात भांडण झाली अशी टीका विरोध करतात असे सांगून विरोधकांना विकास कामे दिसत नाहीत आमच्या घरातील भांडणे दिसतात विरोधक काय आमच्या घरात डोकवायला आले होते का आम्ही वारकरी संप्रदायातील लोक असून मी मुलांना चांगले संस्कार दिल्याचे त्यांनी सांगितले यावेळी प्रतिभा पाचपुते यांना अश्रू अनावर झाले होते

*पाचपुते पती,पत्नी सह उपस्थित कार्यकर्ते देखील झाले भावुक*
आजच्या या सांगता सभेवेळी आमदार बबनराव पाचपुते आणि त्यांच्या पत्नी सौ प्रतिभा पाचपुते यांनी भावनिक होऊन आपला मुलगा विक्रम याला विजयी करण्यासाठी साद घातली यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमधील अनेक महिला व पुरुष कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते

या सभेसाठी भाजप सह महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले

*अखेर पानसरे आणि नाहाटा पाचपुते सोबत*
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाळासाहेब नाहाटा व दत्तात्रय पानसरे यांची या निवडणुकीतील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच त्यांनी महायुती धर्म पाळत आज पाचपुते यांच्या स्टेजवर हजेरी लावली त्यामुळे ते पाचपुते यांच्यासोबत असल्याचे आज स्पष्ट झाले

आतापर्यत "आमदार" म्हणून काम केल आता आमदाराचा "बाप" म्हणून काम करणार,मुलासाठी आई आणि वडिलांची भावनिक साद!विक्रम पाचपुते यांचं विरोधकांना सयंमी उत्तर! आतापर्यत "आमदार" म्हणून काम केल आता आमदाराचा "बाप" म्हणून काम करणार,मुलासाठी आई आणि वडिलांची भावनिक साद!विक्रम पाचपुते यांचं विरोधकांना सयंमी उत्तर! Reviewed by Prashasak on नोव्हेंबर १८, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.