"प्रेशर कुकर" ची शिट्टी वाजणार सुवर्णा पाचपुते आमदार होणार!


प्रशासक न्यूज,दि.१८ नोव्हेंबर २०२४

यंदा होत असलेली विधानसभा निवडणूक अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे या निवडणुकीमध्ये भाजपच्या एकनिष्ठ असलेल्या आणि सध्या अपक्ष उमेदवारी करणाऱ्या सुवर्णा पाचपुते यांनी उमेदवारी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे

सुवर्णा पाचपुते या एका सामान्य कुटुंबातील महिला कार्यकर्त्या असून त्यांनी प्रामाणिकपणे पक्षनिष्ठा जोपासत आपले काम केले परंतु धनदांडग्या नेत्यांपुढे त्यांना उमेदवारी देताना डावलण्यात आले परंतु कुठल्याही आमिषाला बळी न पडता सुवर्णा पाचपुते यांनी पूर्ण ताकतीने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि मागील काही दिवसांपासून त्या रात्रीचा दिवस करून मतदारसंघ पिंजून काढत आहेत त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत सुवर्णा पाचपुते या आमदार होतील आणि श्रीगोंद्याच्या पहिल्या महिला आमदार म्हणून विधानसभेत जातील असा ठाम आत्मविश्वास पाचपुते यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे

सुवर्णा पाचपुते या मागील वीस वर्षांपासून भाजप पक्षाशी एकनिष्ठ आहेत तालुक्यात मोठे कारखानदार नेते असून सुद्धा त्यांनी श्रीगोंदा तालुक्यात भाजप पक्ष वाढवण्याचे काम केले तालुक्यातील लोकांच्या सुखदुःखात त्या नेहमी सहभागी झाल्या तसेच तालुक्यातील विविध सामाजिक प्रश्नांवर कुठलेही सत्ता नसताना त्यांनी कायम आंदोलने केली शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी लढा दिला त्यामुळे जनहिताची जाणीव असणाऱ्या सुवर्णा पाचपुते या सामान्य कुटुंबातील महिलेला आता आमदार होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही असेही मत त्यांच्या कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने व्यक्त केले

त्यामुळे आता श्रीगोंदा मतदारसंघात इतिहास घडणार असून अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांच्या प्रेशर कुकर या चिन्हाची मतदान रुपी शिट्टी वाजून त्यां मोठं मताधिक्य घेत निवडून येणारच असा ठाम विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला आहे
"प्रेशर कुकर" ची शिट्टी वाजणार सुवर्णा पाचपुते आमदार होणार! "प्रेशर कुकर" ची शिट्टी वाजणार सुवर्णा पाचपुते आमदार होणार! Reviewed by Prashasak on नोव्हेंबर १८, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.