अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांची मतदारसंघ पिंजून काढत प्रचारात आघाडी!मी शेतकऱ्याची स्वाभिमानी लेक.. सुवर्णा पाचपुते यांची मतदारांना साद!
प्रशासक न्यूज,दि.१७ नोव्हेंबर २०२४
भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या सुवर्णा पाचपुते यांनी सध्या श्रीगोंदा तालुक्यासह नगर तालुक्यातील गावांमध्ये जाऊन झंझावाती प्रचार करत प्रचारात आघाडी घेतली आहे
सुवर्णा पाचपुते यांनी अपक्ष उमेदवारी करू नये यासाठी भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवरून आणि स्थानिक पातळीवरून मोठे प्रयत्न झाले परंतु कोणत्याही आमिषाला कोणत्याही दबावाला बळी न पडता सुवर्णा पाचपुते यांनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आणि मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याची स्वाभिमानी लेक असे म्हणत त्या आज दिग्गज उमेदवारांच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत
सुवर्णा पाचपुते यांना मतदार संघातील सर्वच गावांमध्ये मोठा पाठिंबा आणि प्रतिसाद मिळत आहे हे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कन्या आमदार व्हावी असे आता जनतेने ठरवले असून मला विजयी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही असे सुवर्णा पाचपुते आत्मविश्वासाने सांगत आहेत तसेच येत्या 20 तारखेला नवा इतिहास घडणार असून जनता आपल्याला भरघोस मतांनी विजयी करेल असा ठाम विश्वास पाचपुते यांना आहे
अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांची मतदारसंघ पिंजून काढत प्रचारात आघाडी!मी शेतकऱ्याची स्वाभिमानी लेक.. सुवर्णा पाचपुते यांची मतदारांना साद!
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १७, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: