आता "जनता" हाच माझा पक्ष असून ती जनताच मला आमदार करणार!अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांच्या कॉर्नर सभांना मिळतोय उस्फुर्त प्रतिसाद


प्रशासक न्यूज,दि.१७ नोव्हेंबर २०२४

मी माझ्या पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिले पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले परंतु मोठ्या नेत्यांमुळे मला पक्षाने तिकिटापासून डावलल ही निवडणूक न लढवण्यासाठी मला महिला आयोग देण्याचे आणि अजून बरेच वेग वेगळी आमिष दाखवण्यात आले परंतु मी एक शेतकऱ्याची स्वाभिमानी लेक असून फक्त माझ्या मतदारसंघातले वर्षेनुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठवून ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी या धनदांडग्या उमेदवारांविरोधात निवडणूक लढवत आहे त्यामुळे पक्षाने मला तिकीट दिले नसले तरी ही सर्वसामान्य जनता हाच आता माझा पक्ष असल्याचे मत अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांनी व्यक्त केले

अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते या सध्या मतदारसंघातील विविध गावात जाऊन कॉर्नर सभा घेत असून या कॉर्नर सभाना त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे पाचपुते यांनी आतापर्यत विविध सामाजिक प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत परंतु सत्तेशिवाय प्रश्न सुटणार नाहीत म्हणून आपण लोकांच्या हितासाठी आणि श्रीगोंदा तालुक्याचा कायापालट करण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचे मत सुवर्णा पाचपुते यांनी या कॉर्नर सभानमधून व्यक्त केले आहे

तसेच श्रीगोंदा तालुक्यातील जनता ही सुज्ञ् असून ती आता कुणाच्याही भुलथापाना बळी पडणार नाही माझ्यासारख्या निष्ठावान महिलेलाच ते मतदान करून भरघोस मतांनी निवडून देतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला
आता "जनता" हाच माझा पक्ष असून ती जनताच मला आमदार करणार!अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांच्या कॉर्नर सभांना मिळतोय उस्फुर्त प्रतिसाद  आता "जनता" हाच माझा पक्ष असून ती जनताच मला आमदार करणार!अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांच्या कॉर्नर सभांना मिळतोय उस्फुर्त प्रतिसाद Reviewed by Prashasak on नोव्हेंबर १७, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.