मी तर 'रेवड्या' वरचा गडी,..अन्यथा मला पंढरपूरलाच जावं लागेल.. आण्णासाहेब शेलारांची चौफेर फटकेबाजी,तर ऋषिकेश यांची भावानीक साद!


प्रशासक न्युज,दि.१६ नोव्हेंबर २०२४
विशाल अ चव्हाण 

श्रीगोंद्याचं राजकारण दिवसागणिक वेगळ्या वळणावर जाताना पाहायला मिळत आहे आज श्रीगोंद्यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारासाठी शहरातील बाजारतळ येथील राम मंदिर परिसरात वंचित चे अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला अपेक्षेपेक्षा जास्त मोठा प्रतिसाद मिळाला या प्रचार सभेत वंचित कडून निवडणूक लढवणारे आण्णासाहेब शेलार यांनी आपल्या गावराण शैलीत चौफेर केलेल्या राजकीय फटकेबाजीमुळे सभेत चांगलाच हश्या पिकला

या सभेत बोलताना ऍड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी निजामी मराठ्यांकडून महाराष्ट्राचा सुरळीत सुरु असलेला गावगाडा बिघडवण्याचे काम सुरु असल्याची घणाघाती टीका करत तीन कारखानदारांविरोधात मी एक सामान्य शेतकरी उमेदवार उभा केल्याचे सांगून जो उमेदवार आपल्या आईचा झाला नाही तो तुमचा काय होणार अशी टीका त्यांनी विरोधी उमेदवारावर केली तसेच न्यायव्यस्थेकडून आरक्षण धोक्यात आले असून भाजप आणि मोदींकडून आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी आंबेडकर यांनी केला तसेच वंचितचे आमदार निवडून गेल्यावर कोणत्याही धर्माच्या देव देवतांवर आक्षेपर्ह विधान करणाऱ्यांना सात वर्ष्याच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद असलेले विधेयक तयार करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले

*मी तर रेवड्या वरचा गडी*

सध्याची निवडणूक ही लोकशाही च्या मार्गाने नाही तर "रोख" शाहीच्या मार्गाने सुरु असल्याचे सांगत २८तारखेपर्यत समोरच्या उमेदवारांकडून माझा सौदा सुरु होता समोरचे उमेदवार हे हिंदकेसरी,महाराष्ट्र केसरी पैलवान असून मी आपला साधा रेवड्या वरचा गडी आहे असा उपरोधीक टोला शेलार यांनी विरोधकांना लगावताच सभास्थळी एकच हश्या पिकला.

*एक म्हणतो तिकीट चोरलं तर दुसरा म्हणतो बाप चोरला*
सध्याच्या निवडणुकीत एक उमेदवार म्हणतो माझं तिकीट चोरलं तर दुसरे उमेदवार म्हणतात आमचा बाप चोरला अशी टीका विरोधी उमेदवारांची सुरु आहे असं शेलार यांनी सांगून मी तालुक्यातील सर्व नेत्यां सोबत मैत्री केली पाचपुते यांच्या सोबत मैत्री केली आणि वीस वर्षे खोटं बोलत राहिलो अशी मिश्किल टीका त्यांनी पाचपुते यांच्यावर केली

*..अन्यथा मला पंढरपूरच्या पायऱ्यानवर जाऊन बसावं लागेल*
या निवडणुकीत पैश्याचा पाऊस पडत आहे तुम्ही मला साथ न देता जर काही गडबड केली तर मात्र मला पंढरंपुरला जाऊन तिथं परात घेऊन पायऱ्यानवर बसावं लागेल असा चिमटा त्यांनी उपस्थिताना घेतला यावेळी सभास्थळी चांगलीच खदखद पिकली.तसेच डिभे माणिकडोह बोगद्याला दिलीप वळसे पाटलांकडून होणाऱ्या विरोधाचा समाचार घेत मी आमदार झालो तर वळसे तुमचा कॅनोल फोडून टाकेल असा सज्जड दम देत हे करण्यासाठी हिंमत लागते असे सांगून समोरचे सगळे ईडीच्या दबावाखाली आहेत असे शेलार यांनी सांगितले तसेच माझ्या गाड्या चेक करा पण विरोधकांच्या गाड्या चेक करू नका लोकांना त्यांचे पैसे मिळू द्या गरिबांचा फायदा होईल असे शेलार यांनी पोलिसांना उद्देशून बोलताच त्यां ठिकाणी मोठा हश्या झाला

*ऋषिकेश यांची वडिलांसाठी भावनिक साद*
या निवडणुकीत जर तुम्ही माझ्या वडिलांना साथ दिली नाही तर परत कोणताच सामान्य घरातील उमेदवार कारखानदारांच्या विरोधात उभा राहणार नाही अशी भावनिक साद आण्णासाहेब यांचे चिरंजीव बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार यांनी उपस्थित जनसमुदायाला घातली यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले

*गोरख आळेकर यांचा शेलारांना पाठींबा*
विधानसभा निवडणूक लढवणारे उमेदवार गोरख आळेकर यांनी आज या सभास्थळी येत आण्णासाहेब शेलार यांना जाहीर पाठींबा दिला आळेकर यांच्या प्रमाणेच बापू माने आणि समता परिषदेचे संजय डाके यांनी देखील आण्णासाहेब शेलार यांना पाठींबा जाहीर केला

आजच्या सभेसाठी प्रसिद्ध लावणी कलाकार सुरेखा पुणेकर,वंचितचे प्रवक्ते ऍड अरुण जाधव,तय्यब जाफर,संतोष जौजाळ,सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक कांतीलाल कोथिंबिरे,दीपक बोराडे, ज्ञानदेव गवते,यांच्यासह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता

मी तर 'रेवड्या' वरचा गडी,..अन्यथा मला पंढरपूरलाच जावं लागेल.. आण्णासाहेब शेलारांची चौफेर फटकेबाजी,तर ऋषिकेश यांची भावानीक साद! मी तर 'रेवड्या' वरचा गडी,..अन्यथा मला पंढरपूरलाच जावं लागेल.. आण्णासाहेब शेलारांची चौफेर फटकेबाजी,तर ऋषिकेश यांची भावानीक साद! Reviewed by Prashasak on नोव्हेंबर १६, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.