जनतेचा मिळणार मोठा प्रतिसाद माझ्यासाठी प्रेरणादायी!मोठ्या मताधिक्याने विजयी होणारच.. अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते!
प्रशासक न्यूज,दि.१६ नोव्हेंबर२०२४
मी भाजप ची प्रामाणिक महिला कार्यकर्ती आहे माझ्या पाठीमागे कोणतेही पाठबळ नसताना सुद्धा एक शेतकऱ्याची लेक म्हणून मी पक्षाचे काम प्रामाणिक केले पक्षाशी एकनिष्ठ राहिले सर्वसामान्य जनतेशी नाळ कधी तुटू दिली नाही परंतु पक्षाकडून मला उमेदवारी मिळाली नाही पण जनसामान्य माणसानी मला उमेदवारी करण्याचा आग्रह केला तालुक्यात अनेक वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात लढा देण्यासाठी अपक्ष उमेदवारी करत असल्याचे मत अपक्ष उमेदवारी करणाऱ्या उमेदवार सौ सुवर्णा पाचपुते यांनी व्यक्त केले
सोबत कोणताही मोठा नेता नसताना सुद्धा सुवर्णा पाचपुते यांनी मतदारसंघात चांगली वातावरण निर्मिती केली आहे त्यां सध्या तालुक्यातील सर्व गावात जाऊन मतदारांच्या व्यक्तिगत भेटीगाठी घेत आहेत नागरिक त्यांना स्वतःहून आमच्या गावात येऊन सभा घ्या असा आग्रह करत आहेत जनतेचा हा मिळणारा उदंड प्रतिसाद मला अजून लढण्यासाठी बळकटी देत असून लोकांच्या या शुभेच्छा आणि आशीर्वादाच्या जोरावर आपण येत्या २०तारखेला होणाऱ्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवू असा आत्मविश्वास सुवर्णा पाचपुते यांनी बोलून दाखवला आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: