प्रशासक न्यूज,दि.१६ नोव्हेंबर २०२४
श्रीगोंदा, ता. १४ : श्रीगोंदा - नगर मतदार संघामधील वाळकी गटामध्ये गाव संवाद दौरा करत असताना भाजपमधून बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांचे फटाके आणि तोफा फोडून स्वागत करण्यात आले. अनेक वर्षांपासून भाजप पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या सुवर्णा पाचपुते यांना भाजपकडून उमेदवारीसाठी डावलण्यात आल्याने त्यांच्यासाठी वाळकी गटामधून सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे.
निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे वातावरण चांगलेच तापत आहे अनेक वर्षांपासून पासून सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांचे वाळकी गटाकडे असलेले दुर्लक्ष गाव संवाद दौऱ्यामध्ये लोक सांगत आहेत सामान्य शेतकऱ्याची मुलगी म्हणून त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे असं पाचपुते म्हणाल्या.
विकासाची ही नवी दिशा एकत्र मिळवूया आणि आपल्या मतदारसंघाचे भविष्य उज्वल करूया. येत्या २० तारखेला तारखेला "प्रेशर कुकर" या चिन्ह समोरील बटन दाबून आशिर्वाद द्यावे विनंती सुवर्णा पाचपुते यांनी यावेळी मतदारांना केली.
चौकट
श्रीगोंदा - नगर मतदारसंघात वाळकी गटातील गावागावांतील जनतेशी संवाद साधताना, जनतेचा आशीर्वाद आणि विश्वास हा अनमोल ठेवा आहे हे पुन्हा पुन्हा जाणवत आहे. गावोगावी मातांच्या औक्षणाने, गावकरी च्या आशीर्वादाने, तरुणांच्या जोशाने आणि प्रत्येक नागरिकाच्या उत्साहाने स्वागत होत आहे, त्यातून मिळणारे प्रेम व आत्मीयता खूपच प्रेरणादायक आहे. आपल्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्याचा आणि श्रीगोंदा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचा दृढ संकल्प आहे - सुवर्णा पाचपुते अपक्ष उमेदवार

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: