मला मिळणाऱ्या भरघोस पाठींब्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली..आण्णासाहेब शेलार!


प्रशासक न्यूज,दि.१५ नोव्हेंबर २०२४

श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब सि. शेलार यांच्या प्रचार मोहिमेचा शेवटचा टप्पा सुरू आहे. प्रचाराच्या या अंतिम टप्प्यात शेलार यांना स्थानिक बहुजन आणि सामान्य जनतेकडून मिळणाऱ्या वाढत्या पाठींबामुळे प्रस्थापित उमेदवारांना मोठी चिंता लागून राहिली आहे. जनतेच्या या भरघोस पाठिंब्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे प्रतिक्रिया आण्णासाहेब शेलार यांनी दिली आहे 

प्रस्थापित उमेदवारांनी,अण्णासाहेबांचे समर्थक असलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विविध दबाव व आर्थिक तंत्रांचा वापर करून त्यांच्या पाठींब्याचा आधार उधळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार मोहिमेला खिळ बसवण्यासाठी विरोधकांनी एकसंध होऊन राजकीय षडयंत्र रचले असल्याचे चित्र उभे राहिले आहे. विरोधकांनी सर्वच ठिकाणी प्रयत्न करून अण्णासाहेबांच्या टीमला बाजूला करण्यासाठी अर्थिक दडपण, दबाव आणि प्रभावाचा वापर केला आहे.

या राजकीय घडामोडींमध्ये अण्णासाहेब शेलार यांनी मात्र शांतता आणि संयमाने आपला प्रचार सुरू ठेवला आहे. सामान्य मतदारांवर पूर्ण विश्वास ठेवून ते हा संघर्ष शेवटपर्यंत लढणार आहेत. त्यांच्या या धीरोदात्त भूमिकेचे कौतुक त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे, हे विशेष. जनतेच्या विश्वासावर अवलंबून असलेल्या शेलार साहेबांच्या जिद्दीला पाहून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास दुपटीने वाढला आहे.

अण्णासाहेबांना घेरण्याचे जे चक्रव्यूह विरोधकांनी रचले आहे, त्यात त्यांना यश मिळणार की बहुजनांच्या पाठीशी असलेला जनतेचा विश्वास या षडयंत्राला यशस्वीपणे भेदेल..?, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल. मतदाना दिवशी हा प्रश्न सुटेल, आणि अण्णासाहेबांच्या विजयाचे स्वप्न साकार होईल की नाही,..? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या नियोजित सभेला गर्दी कमी राहावी यासाठी काही शक्तींनी लोकांना पैसे देऊन त्यात उपस्थित राहू नये असा दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे आंबेडकर यांच्या समर्थकांत तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, ते त्यांच्या अधिकारांसाठी या कारस्थानाविरुद्ध उभे राहण्यास सज्ज झाले आहेत. याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे की, लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य असावे, मात्र अशा प्रकारच्या दबावाने सभा उधळण्याचा प्रयत्न होतो आहे हे दुर्दैवी असल्याचे शेलार यांचे कार्यकर्ते सांगत आहेत

मला मिळणाऱ्या भरघोस पाठींब्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली..आण्णासाहेब शेलार! मला मिळणाऱ्या भरघोस पाठींब्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली..आण्णासाहेब शेलार! Reviewed by Prashasak on नोव्हेंबर १५, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.